स्वयंसूचना घेण्यासंदर्भात साधकांना दिलेल्या सूचनेचे पालन केल्यावर एस्.एस्.आर्.एफ्.चे ऑस्ट्रियातील साधक श्री. अद्रियन डूर् यांना आलेली अनुभूती

श्री. अद्रियन डूर्

१. स्वयंसूचना घेण्यासंदर्भातील सूचना आणि तिचे पालन केल्यामुळे स्वयंसूचना आठवून सूचनासत्र करता येणे

‘काही दिवसांपूर्वी स्वयंसूचना घेण्यासंदर्भात सर्व साधकांना एक सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये ‘स्वयंसूचना कागदावर लिहून त्यांच्याभोवती मंडल घालून त्या एका खोक्यात ठेवाव्यात आणि प्रतिदिन खोक्याभोवती उदबत्ती ओवाळावी’, असे सांगितले होते. या सूचनेचे पालन केल्यावर दोन वर्षांनंतर प्रथमच मी भ्रमणभाष संचामध्ये लिहिलेली स्वयंसूचना न पहाता सूचनासत्र करू शकलो. त्यापूर्वी मी नेहमी स्वयंसूचनाच विसरून जायचो. कितीही प्रयत्न केले, तरी मला त्या सूचनाच आठवत नसत.

२. स्वयंसूचना लिहिलेल्या खोक्याभोवती उदबत्ती फिरवल्यामुळे त्या स्वभावदोषांची तीव्रता न्यून होणे

स्वयंसूचना लिहून ठेवलेल्या खोक्याभोवती उदबत्ती फिरवत असतांना ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवतेे, तसेच कधी कधी माझा भावही जागृत होतो. ज्या स्वभावदोषांसाठी स्वयंसूचना लिहून मी मंडल घातले आहे, त्या स्वभावदोषांचे प्रकटीकरण आता अल्प प्रमाणात होत आहे.

प्रतिदिन मिळणारे मौल्यवान मार्गदर्शन, अनुभूतींच्या रूपात माझ्यावर केलेली कृपा आणि अनुभूती लिहिण्याची मला दिलेली प्रेरणा, यांसाठी मी भगवान श्रीकृष्ण अन् प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. अद्रियन डूर्, ऑस्ट्रिया (१.२.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF