रेल्वेभरतीत केवळ महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे ! – राज ठाकरे, मनसे

मुंबई – रेल्वेभरतीत बाहेरचे घुसणार नाहीत आणि केवळ महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकद्वारे केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता मोठ्या प्रमाणावर रेल्वेभरती आहे. आवेदन अर्ज कसा भरावा, सिद्धता कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे पक्षातील सहकारी अभिजित पानसे यांनी एका तज्ञाची २० मिनिटांची मुलाखत घेतली आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करा.

रेल्वेभरतीत मराठी मुलांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वर्ष २००८ मध्ये केलेल्या आंदोलनामुळे रेल्वे भरतीच्या परीक्षांचे विज्ञापन स्थानिक वृत्तपत्रात येऊ लागले आणि त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेत परीक्षा देणे अन् नोकरीत निवड होण्यासाठी स्थानिक भाषा येणे अनिवार्य केले गेले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now