विनयभंगप्रकरणी मनसेचे माजी आमदार अटकपूर्व जामिनावर

असे लोकप्रतिनिधी जनतेचे काय रक्षण करणार ?

नवी मुंबई – एका १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर ते पसार झाले होते. १८ मार्च या दिवशी न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन संमत केला आहे. ऐरोलीत रहाणारे एक कुटुंब मंगेश सांगळे यांच्या परिचयाचे आहे. या कुटुंबातील ही मुलगी आहे. मागील वर्षी ऑक्टोबर मासामध्ये सांगळे यांनी या मुलीला चारचाकीतून घरी सोडण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF