किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांच्या निवासस्थानी वसंतपंचमीला नागपूजेच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांकडून गायनसेवा सादर !

संगीत सदर

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ (परात्पर गुरु) डॉ. आठवले

माघ शुक्ल पक्ष पंचमी (वसंतपंचमी, १०.२.२०१९) या दिवशी नागपूजेच्या निमित्ताने किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांच्या निवासस्थानी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिका सौ. सीमंतिनी बोर्डे, सौ. अनघा जोशी आणि कु. तेजल पात्रीकर यांनी गायनसेवा सादर केली. या अनुभूतींचा काही भाग १७ मार्च आणि २१ मार्च या दिवशी प्रसिद्ध केला. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

प.पू. देवबाबा यांच्या निवासस्थानी नागबन (नागांचे वारूळ) आहे. प्रतिवर्षी वसंतपंचमीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठा उत्सव असतो. त्या दिवशी तेथे नागपूजा केली जाते. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आज पाहूयात.

प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव

१. प.पू. देवबाबांच्या निवासस्थानी झालेल्या नागदेवतेच्या पूजनापूर्वी आणि पूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

१ अ. कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ १. प.पू. देवबाबांकडे जाण्याची सिद्धता करत असतांना आणि प्रवासात २ नाग समवेत असल्याचे जाणवणे अन् त्यांच्या माध्यमातून देव वाईट शक्तींपासून रक्षण करत असल्याची अनुभूती येणे : ‘८.२.२०१९ या दिवशी प.पू. देवबाबांकडे जाण्यासाठी सिद्धता करत असतांना माझ्या अवतीभोवती सूक्ष्मातून २ मोठे नाग आहेत’, असे मला जाणवले. आम्ही मुल्की येथे जाण्यासाठी मडगाव आगगाडी स्थानकावर जातांना आणि तेथून प्रवासाला आरंभ केल्यानंतरही मधे-मधे दोन्ही नागदेवता माझ्या समवेत असल्याचे मला जाणवत होते. त्यानंतर मी झोपले असतांनाही ‘ते नाग माझ्याभोवती आहेत आणि त्या नागांचे एक पारदर्शक पांढर्‍या रंगाचे कवच माझ्याभोवती आहे’, असे मला जाणवत होते.

सकाळी ९.३० वाजता अकस्मात् मला थोडी जाग आल्यानंतर ‘माझ्याभोवती कुठल्यातरी आकृत्या आहेत’ असे मला जाणवले; परंतु ‘नागदेवतांचे कवच असल्यामुळे त्या आकृत्या माझ्याजवळ येऊ शकत नव्हत्या’, असे माझ्या लक्षात आले. थोड्या वेळाने डोळे उघडून पाहिल्यानंतर माझ्यासमोर २ अन्य पंथीय स्त्रिया बसल्याचे माझ्या लक्षात आले. एरव्ही अन्य पंथीय व्यक्ती माझ्याजवळ आल्यास किंवा मला दिसल्यावर मला त्रास देणार्‍या मोठ्या वाईट शक्तीचा मला मोठ्या प्रमाणात त्रास होतो; परंतु ‘या वेळी या नागांचे माझ्याभोवती कवच असल्यामुळे मला त्या स्त्रियांपासून काही त्रास झाला नाही’, असे मला वाटले.

१ अ २. प.पू. देवबाबांच्या आश्रमात गेल्यावर नाग अदृश्य होणे आणि ‘दुसर्‍या दिवशी नागदेवतेची पूजा आहे’, हे कळल्यावर ‘आदल्या दिवशीपासूनच प्रत्यक्ष नागदेवताच समवेत आहेत अन् त्यांच्या कृपेमुळेच मी या पूजनासाठी उपस्थित राहू शकले आहे’, हे लक्षात येणे : प.पू. देवबाबांच्या आश्रमात गेल्यानंतरही ‘ते नाग सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला काही वेळ जाणवले. त्यानंतर थोड्या वेळाने ते अदृश्य झाल्याचे जाणवले. ‘दुसर्‍या दिवशी नागदेवतेची पूजा आहे’, हे कळल्यावर मला ‘आदल्या दिवसापासूनच प्रत्यक्ष नागदेवता माझ्या समवेत आहेत आणि त्यांच्या कृपेमुळेच मी या पूजनासाठी उपस्थित राहू शकले आहे’, असे लक्षात आले.

१ अ ३. प.पू. देवबाबांच्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या नागबन येथे गेल्यावर सूक्ष्मातून मोठी नागदेवता दिसणे, तिच्यातून पुष्कळ चांगली शक्ती प्रक्षेपित होत असून ती शक्ती साधिकेच्या मणिपुरचक्रातील त्रासदायक शक्ती खेचत असल्याचे जाणवणे आणि त्यामुळे पूजा झाल्यावर साधिकेला हलके अन् उत्साही वाटणे : आम्ही प.पू. देवबाबांच्या निवासस्थानामधील नागबन या ठिकाणी गेलो. तेथील नागाची मूर्ती बघतांना सूक्ष्मातून एक पुष्कळ मोठी नागदेवता माझ्यासमोर आली. ती नागदेवता विराट रूपामध्ये होती. तिला अनेक मुखे होती आणि तिचा रंग सोनेरी-चंदेरी अन् थोडासा निळसर होता. ‘त्या नागदेवतेच्या शिरावर असलेल्या मण्यातून पुष्कळ प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले. त्या नागदेवतेमधून पुष्कळ चांगली शक्ती प्रक्षेपित होत असून ती शक्ती माझ्या मणिपुरचक्रातील त्रासदायक शक्ती खेचत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे पूजा झाल्यावर मला पुष्कळ हलके आणि उत्साही वाटत होते.

१ अ ४. नागबनातील नागदेवतेसमोर नागाचे प्रतीकस्वरूप काढलेल्या रांगोळीतून नागाची शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे आणि ‘ती रांगोळी म्हणजे नागाशी संबंधित ‘यंत्र’ आहे’, असे वाटणे : नागबन या ठिकाणी एक पुरोहित नागाची रांगोळी काढत होते. या रांगोळीमधून पुष्कळ प्रमाणात नागाची शक्ती प्रक्षेपित होत होती. ‘जसजशी रांगोळी पूर्ण होत होती, तसतशी नागाची शक्ती मोठ्या प्रमाणात जागृत होऊन ती वाढत आहे’, असे मला जाणवले. जेव्हा रांगोळी पूर्ण झाली, तेव्हा ‘त्या रांगोळीत प्रत्यक्ष नागदेवता आणि तिची शक्ती आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्या रांगोळीकडे बघितल्यावर ‘ती रांगोळी म्हणजे नागाशी संबंधित ‘यंत्र’ आहे’, असे मला वाटले.’

१ आ. कु. मृणालिनी देवघरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

१ आ १. ‘नागबन हे जागृत स्थान असावे’, असे वाटणे आणि तेथे एक प्रकारची ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : ‘प.पू. देवबाबांच्या निवासस्थानी असलेल्या नागबन येथील पूजेच्या ठिकाणचे वातावरण पुष्कळच आनंदी जाणवत होते. वातावरणात पुष्कळ प्रकाश जाणवत होता. नागबनाच्या आत गेल्यावर ‘ते जागृत स्थान असावे’, असे वाटत होते. नागबनाच्या आत बाहेरच्यापेक्षा अधिक प्रमाणात शक्ती जाणवत होती. नागबनाच्या आत जाताक्षणी तेथे एक प्रकारची ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत होते.

१ आ २. आरतीच्या वेळी सूक्ष्मातून दोन नाग दिसून त्यांच्या मागे पुष्कळ प्रकाश दिसणे : आरती चालू झाली, तेव्हा ‘मागून निळ्या रंगाचे २ नाग (सूक्ष्मातून) वर आले आहेत आणि त्यांच्या मागे पुष्कळ प्रकाश आहे’, असे वाटले.

१ आ ३. नागपूजेसाठी काढलेल्या सर्पाच्या रांगोळीतून पुष्कळ मारक शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत होते.’

रामनाथी आश्रमात वसंतपंचमीच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुका-धारण विधी आणि नंतर ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदकांची पूजा होणार असल्याचे समजणे अन् प.पू. देवबाबांकडे त्याच दिवशी होत असलेली नागदेवतेची पूजा बघून ‘प्रत्यक्ष श्रीविष्णूनेच त्याची पूजा होण्याआधी शेषाच्या पूजेचे नियोजन केले’, असा विचार मनात येणे

प.पू. देवबाबा यांच्या निवासस्थानी असलेल्या नागबनातील नागदेवतेसमोर नागाची प्रतीकस्वरूप काढलेली रांगोळी !

‘१०.२.२०१९ या दिवशी, म्हणजे वसंतपंचमीच्या दिवशी रामनाथी आश्रमामध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुका-धारण विधी आणि ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदकांची पूजा होणार असल्याचे समजले अन् प.पू. देवबाबांकडेही वसंतपंचमीच्या दिवशीच नागपूजा होती. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे साक्षात् विष्णुरूप आहेत आणि ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदक हे लक्ष्मीस्वरूप आहे. त्यामुळे ‘त्यांची पूजा होण्याआधी श्रीविष्णु प.पू. देवबाबांकडील शेषाचे पूजन करून घेत आहे आणि हे सर्व भगवान श्रीविष्णूचेच नियोजन आहे’, असे लक्षात आले. या माध्यमातून भगवान श्रीविष्णूनेच ‘सनातन संस्थेच्या सर्व साधकांना नागदेवतेचे आशीर्वाद मिळावे आणि चांगले आरोग्य मिळावे’, यासाठी आम्हा साधकांना नागपूजेत सहभागी होण्याची संधी दिली’, असा विचार माझ्या मनात आला. ‘ही पूजा म्हणजे साक्षात् शेषाची पूजा आहे’, असेही मला जाणवले.’

– कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ इ. सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. ‘प.पू. देवबाबांच्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या नागबन येथे पाय ठेवताच माझे मन निर्विचार झालेे. तेथे शक्ती आणि ध्यान यांची प्रचंड स्पंदने जाणवत होती.

२. गायनसेवा करण्यापूर्वी मी नागदेवाच्या मूर्तीला नमस्कार केला, तेव्हा नागाचा केवळ प्रचंड मोठा मणिधारी फणा दिसून त्याचा प्रकाश सगळीकडे पसरत असल्याचे जाणवले.

३. मी नागदेवतेच्या मूर्तीपाशी नामजपासाठी थांबले, तेव्हा माझे मन निर्विचार होऊन मला आजूबाजूचा विसर पडला. त्यानंतर प.पू. देवबाबांनी सूक्ष्मातून मला तेथील वारूळात नेल्याचे जाणवले. वारूळात गेल्यावर तेथे गाढ शांतता जाणवली. तेथे पुष्कळ नाग होते. त्या नागांचे दर्शन घेऊन मी प्रार्थना केली. बराच वेळ प.पू. देवबाबा आणि मी तेथे होतो. ‘तेथून परत येऊच नये’, असे मला वाटत होते.

४. नागदेवतेची पूजा करणार्‍या पुजार्‍याने आम्हाला प्रार्थना करायला सांगितले. तेव्हा ‘मी मनात करत असलेल्या प्रार्थनाच पुजारी सांगत आहे’, हे लक्षात आले. तेव्हा ‘देवाला अपेक्षित असे तोच करवून घेतो’, असे मला जाणवत होते.’

२. गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकेला आलेल्या अनुभूती

२ अ. सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. ‘शंभो, शंकरा, करुणाकरा’ या भक्तीगीताचा सराव करत असतांना आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवून माझे मन एकाग्र होत होते.

२. भक्तीगीतांचा सराव करतांना माझा आधीचा आवाज आणि आताचा आवाज यांत पुष्कळ भेद जाणवत होता. माझा आवाज विशेष प्रयत्न न करता सहज चढत होता.

३. भूपाली रागातील ‘ॐ नमः शिवाय ।’ हे भक्तीगीत म्हणतांना ते स्वर आनंदी झाल्याचे मला जाणवले. मालकंस रागातील ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भक्तीगीत म्हणतांना माझ्या देहाभोवती केशरी रंगाचे जाड वलय दिसले. माझा सूक्ष्मदेह पिवळा झाल्याचे दिसले. भजन संपल्यावर मी वेगळ्याच अवस्थेत गेले.’

३. गायनसेवा सादर करणार्‍या साधिकांना आलेल्या अनुभूती

३ अ. सौ. सीमंतिनी बोर्डे, संभाजीनगर

१. ‘मला कार्यक्रमस्थळी नागदेवतेचे अस्तित्व जाणवत होते.

२. ‘पद्मनाभा नारायणा’ हे गीत गातांना गुरुमाऊलीचे शेषशायी रूप दिसत होते.

३. वातावरणात पुष्कळ उष्णता होती. एरव्ही मला उकाड्याचा फार त्रास होतो; परंतु भजन गातांना मला त्याची जाणीव झाली नाही.

४. भावाच्या स्तरावर राहून भक्तीगीत गातांना मला गीतात वर्णन केल्यानुसार त्या त्या देवतेचे अस्तित्व जाणवत होते.’

३ आ. सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. ‘भक्तीगीते म्हणतांना मी माझ्या आत-आत जात असल्याचे जाणवत होते.

२. ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भक्तीगीत म्हणतांना ‘देव भक्तासाठी किती करतो !’, हे आठवून माझा भाव जागृत होत होता, तसेच माझे मन निर्विचार होत होते.

३. गायनसेवेचा कार्यक्रम झाल्यावर मला आतून पुष्कळ शांत वाटत असल्याचे जाणवले. डोळे उघडे असूनही मी निर्विचार असल्याचे मला जाणवत होते. ही स्थिती ३ दिवस टिकून होती.’

४. कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

४ अ. कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘वाजे मृदंग, टाळ, वीणा’ हे भजन ऐकतांना माझ्या मनाला पुष्कळ आनंद होत होता.

२. ‘गुरुदेव, तव महनीय कृपा’ हे भजन ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा दोघेही एकच असल्याचे दिसले.

३. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे भजन ऐकतांना ‘साक्षात लक्ष्मीमाता आणि भगवान श्रीविष्णु हे विराट रूपात आहेत आणि ते शेषाची पूजा वात्सल्यभावाने बघत आहेत’, असे मला जाणवले.

४. ‘कानडा राजा पंढरीचा’ हे विठ्ठलाचे भजन ऐकतांना मन पुष्कळ एकाग्र होऊन माझे ध्यान लागले. ‘संपूर्ण वातावरणात पुष्कळ शक्ती, चैतन्य आणि आनंद यांचे प्रक्षेपण होत आहे’, असेही मला जाणवले.

५. ‘शंभो, शंकरा, करुणाकरा’ या भजनाच्या वेळी ‘भगवान शंकर विराट रूपात समोर आला आहे आणि त्याच्याकडून आशीर्वाद मिळत आहे’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती होत होती.’

४ आ. श्री. सुधीर बोर्डे, संभाजीनगर

१. ‘कार्यक्रमाच्या वेळी मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते. कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्ही जेथे बसलो होतो, तेथे ऊन येत होते, तरीही पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत उन्हाची जाणीव झाली नाही.

२. कार्यक्रमात मंद पिवळा प्रकाश सगळीकडे पसरलेला जाणवला.

३. ‘कार्यक्रमाच्या आरंभीपासूनच तेथे नागदेवतेचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवत होते. ‘कुठूनतरी नागदेवता येऊन दर्शन देईल’, असे मला वाटत होते.

४. सौ. अनघा जोशी यांनी गायलेल्या ‘शंभो, शंकरा, करुणाकरा’ या भक्तीगीताच्या वेळी ‘सगळीकडे शिवतत्त्व आहे’, असे मला जाणवले.

५. ‘प.पू. देवबाबांच्या अस्तित्वानेही वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे’, असे मला जाणवत होते.’

४ इ. सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. ‘सौ. सीमंतिनी बोर्डे यांनी ‘गुरुदेव, तव महनीय कृपा’ हे भक्तीगीत म्हणायला आरंभ प.पू. देवबाबा कार्यक्रमस्थळी येऊन माझ्यासमोर उभे असल्याचे मला जाणवले आणि प्रत्यक्षातही सीमंतिनीताईंचे धृपद झाल्यावर प.पू. देवबाबा कार्यस्थळी आले.’

५. प.पू. देवबाबांच्या निवासस्थानी गेल्यावर आलेल्या अनुभूती

अ. ‘प.पू. देवबाबांच्या घरी गेल्यावर माझे मन निर्विचार झाले. ध्यानाची स्पंदने घराला व्यापून असल्याचे मला जाणवले. संतांच्या अस्तित्वाने आणि त्यांच्या साधनेने घरातील वातावरणावर होत असलेला परिणाम देवाच्या कृपेने मला अनुभवायला मिळाला.

आ. प.पू. देवबाबांचे घर म्हणजे ध्यानाचा प्रचंड स्रोतच असल्याचे मला जाणवत होते.’

– सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल

६. प.पू. देवबाबांच्या संदर्भात आलेली अनुभूती

‘कार्यक्रम झाल्यावर मला एक सेवा करायची संधी मिळाल्यामुळे आणि प.पू. देवबाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिल्यामुळे पुष्कळ भावजागृती होऊन माझे मन कृतज्ञतेने भरून आलेे.

प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेनेच या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची संधी मला मिळाली. हा भक्तीगीत गायनसेवेचा कार्यक्रम प.पू. देवबाबांच्या निवासस्थानी असल्यामुळे त्यांच्या घरी आणि आश्रमात जाण्याची अमूल्य संधी मला मिळाली, यासाठी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता !’

– श्री. सुधीर बोर्डे, संभाजीनगर (मार्च २०१९)

(समाप्त)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF