वडोदरा (गुजरात) येथे हिंदु अल्पसंख्यांक होण्याच्या भीतीने विरोध म्हणून हिंदूंचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

मुसलमानांसाठी ८०० घरांची निर्मिती करण्यात येत असल्याचे प्रकरण

  • भाजपशासित राज्यात हिंदूंना अशी भीती वाटते, तर काँग्रेस आणि अन्य हिंदुद्वेषी पक्ष सत्तेवर असलेल्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असेल, हे लक्षात येते !
  • निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने त्याचा लाभ विरोधकांनाच होण्यापेक्षा मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून आणणेच योग्य !
  • मुसलमान बहुसंख्य झाल्यास हिंदूंना ‘आम्ही अल्पसंख्यांक होऊ आणि त्यामुळे पलायन करावे लागेल’, अशी भीती का वाटते, याचे उत्तर निधर्मी आणि पुरो(अधो)गामी कधी देतील का ?

वडोदरा (गुजरात) – येथील निजामपुरामध्ये ५२ सोसायट्यांमधील हिंदूंनी येथे मुसलमानांसाठी ८०० घरांची निर्मिती करून संकुल बांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्याला विरोध चालू केला आहे. ‘या घरांमुळे येथील हिंदू अल्पसंख्यांक होतील’, या भीतीने त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कारही घातला आहे. त्यांनी ‘प्रचारासाठी या सोसायट्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराने येऊ नये’, असा फलकही लावला आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे. माजी महापौर भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

१. नागरिकांनी आरोप केला आहे की, गावातील ही भूमी २ वर्षांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली होती. त्याने ती एका मुसलमानाला विकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हिंदूंना भीती वाटू लागली आहे, ‘येथे मुसलमानांसाठी घरे बांधली गेल्यास त्यांची संख्या वाढून हिंदूंना हाकलून लावले जाईल.’ यामुळे हिंदू विरोध करत आहेत.

२. माजी महापौर भरत शहा म्हणाले की, हा विभाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील भूमी विकण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची अनुमती घ्यावी लागते.

३. येथे मुसलमानांसाठी घरे झाल्यास लोकसंख्येचे संतुलन बिघडेल आणि हिंदू येथून पलायन करतील. आमची अपेक्षा आहे, प्रशासनाने हिंदूंना आश्‍वस्त करावे. गेल्या २ वर्षांपासून आम्ही यासाठी आंदोलन करत आहोत; मात्र काहीच कृती झालेली नाही. (२ वर्षे हिंदूंकडून असे आंदोलन करण्यात येऊनही भाजप सरकारकडून त्यावर कोणतीही कृती होत नसेल, तर सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यायला हवा ! – संपादक) या संदर्भात आता उपविभागीय अधिकार्‍यांनी चौकशी चालू केली आहे.

४. यापूर्वी वर्ष २००५ मध्ये सायाजीपुरा भागामध्येही मुसलमानांसाठी अल्पदरात घरे बांधण्यात येत होती. त्यामुळे तेथील हिंदू अल्पसंख्यांक होण्याची भीती निर्माण झाल्याने हिंदूंनी त्याला विरोध केला होता. त्या वेळी महापौर असणारे भरत शहा यांनी ही योजना मागे घेतली होती.


Multi Language |Offline reading | PDF