वर्ष २००९ ते २०१४ मध्ये खासदार असणार्‍यांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांनी वाढ

  • बहुतांश लोकप्रतिनिधींना कोणताही आर्थिक स्रोत नसतांना त्यांच्या संपत्तीत होणारी ही वाढ संशोधनाचाच विषय आहे !
  • सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्तीत अशा प्रकारे वाढ होत नसते किंवा उद्योगपतींच्या व्यवसायात वाढ होतेच असे नाही; मात्र लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत हमखास वाढ होते, यातून लोकशाहीवर प्रश्‍नच निर्माण होतो !

नवी देहली – ‘इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थांच्या पाहणीनुसार वर्ष २००९ ते २०१४ या ५ वर्षांच्या कालावधीत १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाख रुपयांंची (१४२ टक्के) वाढ झाली आहे. यात भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सर्वांत जलदगतीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसर्‍या क्रमांकावर बिजू जनता दलाचे पिनकी मिश्रा असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

शत्रुघ्न सिन्हा, पिनकी मिश्रा आणि सुप्रिया सुळे

१. वर्ष २००९ मध्ये पुन्हा निवडून आलेल्या या खासदारांची सरासरी संपत्ती साडेपाच कोटी रुपये होती. यात दुपटीने वाढ होऊन ती सरासरी १३.३२ कोटी रुपये इतकी झाली.

२. वर्ष २००९ मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सुमारे १५ कोटी रुपये इतकी होती. वर्ष २०१४ मध्ये त्या संपत्तीत वाढ होऊन ती १३१ कोटी रुपयांवर गेली.

३. बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा यांची संपत्ती १०७ कोटी रुपये होती. त्यात वाढ होत ती १३७ कोटी रुपये झाली.

४. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ५१ कोटी रुपयांंच्या संपत्तीत वाढ होऊन वर्ष २०१४ मध्ये ती ११३ कोटी रुपये झाली.

५. संपत्ती वाढण्यात अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल सहाव्या स्थानी, तर भाजपचे वरुण गांधी १० व्या स्थानी आहेत.

६. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वर्ष २००९ मध्ये असलेल्या २ कोटी रुपयांच्या संपत्तीत वाढ होऊन वर्ष २०१४ मध्ये ती ७ कोटी रुपये इतकी झाली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now