जळगाव जिल्ह्यात पुढील दोन मासांसाठी कलम १४४ लागू !

आचारसंहितेचा सर्वसामान्य व्यक्तीला त्रास होऊ नये हीच अपेक्षा !

जळगाव – आगामी लोकसभा निवडणूक, तसेच सण आणि उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये; म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(१), (२) आणि (३) लागू केले आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश १६ मार्चपासून पुढील ६० दिवसांपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू रहातील, असे जिल्हादंडाधिकारी अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळवले आहे.


Multi Language |Offline reading | PDF