‘सोशल मिडिया’द्वारे हिंदु राष्ट्र-स्थापनेचा प्रभावी प्रसार करा !’ हा फलक उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

सध्याचे युग हे संगणकीय युग मानले जाते. सामाजिक संकेतस्थळे ही आज प्रसाराची प्रभावी माध्यमे आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा प्रसारही सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून चालू आहे. या प्रसाराला गती यावी, अधिकाधिक धर्माभिमानी हिंदू, सामाजिक संकेतस्थळांचा उपयोग करणारे राष्ट्रप्रेमी यांनाही हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी होता यावे, याकरिता ‘सोशल मिडिया’द्वारे हिंदु राष्ट्र-स्थापनेचा प्रभावी प्रसार करा !’ हा ३ फूट × ४.५ फूट आकारातील फ्लेक्स फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे.

या फलकाचा उपयोग राष्ट्र आणि धर्म जागृतीपर प्रदर्शने, ग्रंथप्रदर्शने, सार्वजनिक मंदिरे, वाचनालये, मंडळे यांच्या ठिकाणी करता येईल. हे फलक लावतांना संबंधितांची रितसर अनुमती घ्यावी. तसेच या फलकांसाठी प्रायोजकही मिळवता येतील. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात हिंदूंना सहभागी करून घेणे, ही समष्टी साधना असून त्या साधनेची अमूल्य संधी साधा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now