रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी सरकारने काही नियमावली बनवली आहे का ? – उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्‍न

शवविच्छेदन स्वच्छता कामगारांकडून केले जात असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप

न्यायालयाला अशा प्रकरणात लक्ष का घालावे लागते ? नियमावली बनवणे, हे स्वत:चे दायित्व असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ?

मुंबई – येथील महापालिका रुग्णालयांत शवविच्छेदन आधुनिक वैद्यांकडून नव्हे, तर स्वच्छता करणार्‍या कामगारांकडून करण्यात येते. महिला मृतदेहांचे शवविच्छेदनही तेच करतात, असा आरोप करणारी जनहित याचिका आदिल खत्री यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला याविषयी खडसावले, तसेच ‘रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी सरकारने काही नियमावली बनवली आहे का’, अशी विचारणा करून याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

आदिल खत्री यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा अभाव असतांना आधुनिक वैद्यांना शवागारसेवक, साहाय्यक आधुनिक वैद्य आणि स्वच्छता कामगार साहाय्य करतात. ‘शवविच्छेदनासाठी केवळ प्रशिक्षित आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांनाच अनुमती देण्यात यावी, तसेच महिलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी केवळ महिला आधुनिक वैद्य आणि साहाय्यक यांनाच अनुमती देण्यात यावी, यासाठी न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत’, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

राज्य सरकारच्या वतीने अधिवक्ता पूर्णिमा कंथारिया म्हणाल्या, ‘‘शवागारात जाण्यास महिला आधुनिक वैद्य इच्छुक  नसतात. आधीच महिला आधुनिक वैद्यांची संख्या अल्प आहे. त्यातही या विभागात पारंगत असलेल्यांची संख्या त्याहून अल्प आहे. त्यामुळे शहरांपेक्षा खेडेगावात परिस्थिती अजून बिकट आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now