केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मतदारसंघातील लोकांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

  • प्रत्येक पक्षातील लोकप्रतिनिधींनी ‘निवडणुकीत दिलेले आश्‍वासन पूर्ण न करणे’ हे निरर्थक लोकशाहीचे जणू वैशिष्ट्य आहे !
  • देशभरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी झटणार्‍या गडकरी यांना त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम करण्यास वेळ मिळाला नाही का ?

नागपूर – कळमना भागातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १८ वर्षांपासून सतत मागणी करूनही रस्त्याचे काम न झाल्याने तेथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ४ हा मतदार संघ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी प्रभागातील नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवक आणि आमदार यांच्याकडे मागणी केली; मात्र अद्याप येथील रस्त्याचे काम झालेले नाही. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या कोणत्याही आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे नागरिकांनी वरील निर्णय घेऊन प्रशासनाला निवेदन दिले आहे. या ठिकाणी लोकांनी घरासमोर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे फलकही लावले आहेत. (देशात बर्‍याच ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने नागरिकांनी दिलेली आश्‍वासने न पूर्ण करणार्‍या लोकप्रतिनिधींना मते मागायला आल्यानंतर नागरिकांनी जाब विचारला पाहिजे. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF