नागपूर येथे लाच घेणार्‍या एका अधिकार्‍यास अटक

भ्रष्टाचाराने पोखरलेली शासकीय यंत्रणा ! 

नागपूर – विविध आस्थापनांना मनुष्यबळ पुरवणार्‍या एका आस्थापनाचे गेल्या ७ वर्षांपासून लेखापरीक्षण झाले नव्हते. या कारणास्तव चालकाला कारवाईचा धाक दाखवून ३ लाखांची लाच मागणार्‍या एका अधिकार्‍याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने १७ मार्चला अटक केली. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी विभागातील अंमलबजावणी अधिकारी ए.बी. पहाडे असे त्यांचे नाव असल्याचे समजते. पहाडे यांनी कारवाई टाळण्यासाठी ३ लाख ५० सहस्र रुपयांची लाच देण्याची मागणी केली. त्यामुळे त्या आस्थापनातील संचालकांनी पहाडे यांच्या विरोधात स्थानिक केंद्रीय अन्वेषण विभागातील अधिकार्‍यांकडे तक्रार प्रविष्ट केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now