लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कामगारांना सुटी आणि सवलत !

संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी किंवा २ घंट्यांची सवलत देण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाने १९ मार्चला आदेश काढले आहेत.

१. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी वेतन देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या घंट्यांत योग्य ती सवलत देण्यात येते.

२. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले की, संस्था, आस्थापने भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

३. आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणारी सर्व आस्थापने, कारखाने, दुकानांमधील कर्मचारी, निवासी उपाहारगृहे, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी, औद्योगिक उपक्रम, खासगी आस्थांपनातील कर्मचारी किंवा इतर आस्थापने, माहिती तंत्रज्ञान आस्थापने, ‘शॉपिंग सेंटर’, ‘मॉल्स’ आदींमधील कर्मचार्‍यांना भरपगारी सुटी किंवा अपवादात्मक परिस्थितीत कामगार आणि अधिकारी यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी केवळ २-३ घंट्यांची सवलत देण्यात येणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now