नागपूर येथील जीटी आणि दक्षिण एक्सप्रेस रेल्वेतून मद्यसाठा जप्त !

नागपूर – रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) पोलिसांनी १७ मार्चला जीटी एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस रेल्वेतून मद्यसाठा जप्त करत एकाला अटक केली. देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आरपीएफ महासंचालकांनी रेल्वेतून होणार्‍या मद्यतस्करीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जीटी एक्सप्रेसमध्ये आरपीएफच्या पथकाला एका बॅगेत मद्याच्या १४ बाटल्या आढळल्या. दक्षिण एक्स्प्रेस रेल्वेत १ तरुण संशयास्पद स्थितीत बसलेला होता. आरपीएफ पथकाला त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याजवळील बॅग पडताळली असता त्यात मद्याच्या ९० बाटल्या आढळल्या. मद्यसाठा आणि आरोपी यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द करण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now