‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या संचालकांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी भुसावळ प्रांताधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ येथील प्रांताधिकारी  श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

जळगाव, १९ मार्च (वार्ता.) – ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाने ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाच्या रंगपंचमीनिमित्त प्रसारित केलेल्या विज्ञापनात हिंदूंच्या सणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणीवपूर्वक हिंदूंचा अपमान केला आहे. त्यामुळे या आस्थापनाच्या संचालकांवर भा.दं.सं. कलम २९५ अ आणि १५३ अ नुसार गुन्हा नोंदवण्यात यावा. यातून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित विज्ञापनाच्या प्रसारणावर त्वरित बंदी घालावी, अशा मागण्यांचे निवेदन नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथील प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीसह गोप्रेमी परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF