कोल्हापूर-मिरज मार्गावर मे अखेरीस विजेवर रेल्वे धावण्याची शक्यता

मिरज, १९ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर-मिरज रेल्वे मे अखेरीस विजेवर धावण्याची शक्यता आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण या दोन मागण्यांपैकी पहिल्या टप्प्यात विद्युतीकरणास संमती मिळाली असल्याने हे काम पूर्ण होत आले आहे. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या कालखंडात २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने कोल्हापूर-मिरज-पुणे या रेल्वेच्या विद्युतीकरणांसाठी निधी संमत केला होता. विद्युतीकरणामुळे रेल्वेची गती वाढणे, पैशांची बचत, प्रदूषण अल्प होणे असे साहाय्य होईल.


Multi Language |Offline reading | PDF