पत्रके आणि भित्तीपत्रके छपाईवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्बंध

पणजी (गोवा) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत निवडणूक भित्तीपत्रके आणि पत्रके छापणे यांवर, तसेच प्रकाशित करण्यावर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अन्वये निर्बंध घातले आहेत.

सदर नवीन निर्बंधांविषयी आयोगाने छापखाने, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी इत्यादींसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही व्यक्तीला ज्याच्या दर्शनी भागावर मुद्रकाचे नाव आणि पत्ता नाही, असे कोणतेही निवडणूक भित्तीपत्रक/पत्रक /छपाई /प्रकाशित करता येणार नाही किंवा छपाई/प्रकाशन करण्याची व्यवस्था करता येणार नाही.

१. जोपर्यंत तो त्याचा प्रकाशक आहे याची ओळख म्हणून स्वतः स्वाक्षरी केलेले आणि त्या व्यक्तीला व्यक्तीशः ओळखणार्‍या अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले घोषणापत्र सादर करत नाही.

२. जोपर्यंत मुद्रक दस्तऐवजाच्या छपाईनंतर वाजवी मुदतीत दस्तऐवजाच्या एका प्रतीसह घोषणापत्राची एक प्रत पाठवत नाही, तोपर्यंत हस्तलिखित प्रती तयार करण्याशिवाय अधिक पटींनी प्रती काढण्याची कोणतीही प्रक्रिया म्हणजे छपाई, असे गृहीत धरण्यात येईल आणि त्यानुसार मुद्रक हा शब्द अभिप्रेत धरला जाईल.

जी व्यक्ती या तरतुदींचे उल्लंघन करील तिला ६ महिन्यापर्यंतचा कारावास किंवा २ सहस्र रुपयांचा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now