६६ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भक्ती रोहन मेहता (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. भक्ती रोहन मेहता ही एक आहे !

(‘वर्ष २०१६ मध्ये कु. भक्ती मेहता हिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.’ – संकलक)

फाल्गुन पौर्णिमा (२०.३.२०१९) या दिवशी कु. भक्ती रोहन मेहता हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. भक्ती मेहता

कु. भक्ती रोहन मेहता हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. निर्मळ मन

‘कु. भक्ती घरात सर्वांत लहान असल्याने तिचे पुष्कळ लाड व्हायचे. तिला चुलत भाऊ झाल्यावर तिने ते मनापासून स्वीकारले. ती मला म्हणाली, ‘‘आई, आता माझ्यापेक्षा ईशान लहान आहे. आता मीसुद्धा त्याचे लाड करणार.’’ यातून तिची निर्मळ मन दिसून येते. तिने तुलना किंवा मत्सर न करता सर्व सहजतेने स्वीकारले.

२. प्रेमभाव

माझे आणि तिच्या बाबांचे डोके, पाय किंवा पाठ दुखत असेल, तर भक्ती कापराच्या तेलाने मर्दन करते. आम्हाला बरे वाटेेपर्यंत ती प्रेमानेे चेपत रहाते. तिचे पाय दुखत असले, तरी ती आम्हाला सांगत नाही आणि आम्हाला मर्दन करू देत नाही. ती म्हणते, ‘‘तुम्ही करू नका. तुमचे हात दुखतील.’’

३. शाळेत गेल्यावर नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, प्रतिदिन आईला आढावा देणे अन् मैत्रिणीलाही नामजपाचे महत्त्व अन् ‘प्रार्थना कशी करायची ?’, हे सांगणे

‘शाळेत गेल्यावर रज-तमामुळे आलेले आवरण कसे काढायचे ?’, याविषयी मी तिला समजावून सांगितले. ‘पू. अश्‍विनीताईंच्या (पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या) ध्वनी-चित्रचकतीत पाहिल्याप्रमाणे शाळेत नामजप केल्यावर स्वतःभोवती आणि आसंदीभोवती संरक्षक कवच निर्माण होते’, हे सांगितल्यावर तिने नामजपाचे प्रयत्न चालू केले. ती शाळेत गेल्यावर ‘नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे’, असे प्रयत्न करू लागली. ते बघून तिच्या बाजूला बसलेली मुलगीही नामजप करू लागली. तेव्हा भक्तीने तिला नामजपाचे महत्त्व आणि ‘प्रार्थना कशी करायची ?’, हे सांगून आवरणही काढायला शिकवले. आता ती प्रतिदिन शाळेत प्रयत्न करतांना मैत्रिणीलाही नामजपाची आठवण करून देतेे. शाळा सुटल्यावर मला नामजप आणि प्रार्थना यांचा आढावा देते.

४. साधनेचेे दृष्टीकोन सुस्पष्ट असणे

आम्ही दोघी स्वतःच्या आणि एकमेकींच्या चुका सांगून एकमेकींना साधनेत साहाय्य करतो अन् क्षमायाचना करतो. त्या वेळी तिचे साधनेविषयीचे दृष्टीकोन ऐकून मी अवाक् होते; कारण ते पुष्कळ उच्च स्तराचे असतात. या वयात साधनेची इतकी सुस्पष्टता बघून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

५. तिला दैनिक सनातन प्रभातचे वाचन करायला पुष्कळ आवडते. ती रात्री आमच्याकडून दैनिकातील एक तरी लेख वाचून घेते आणि मग झोपते.

६. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची तळमळ

६ अ. ‘भीती वाटणे’ या स्वभावदोषावर तळमळीने मात करणे : भक्तीमध्ये ‘भीती वाटणे’ हा स्वभावदोष आहे. त्यामुळे ती अंधारात जायला घाबरत असे. याविषयी तिच्याशी बोलल्यावर तिने विचारले, ‘‘मी नेमके कसे प्रयत्न करू ?’’ तेव्हा तिच्या बाबांनी तिला ‘नामजप कर’, असे सांगितले. तेव्हा ती उत्साहाने वैखरीतून नामजप करत अंधारातील दुसर्‍या खोलीत गेली आणि कचरापेटीत कचरा टाकून आली. भीतीवर मात करता आल्याने तिला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘हे तर सोपे आहे. नामजप केल्यावर देव येईल. मग मला घाबरायची काहीच आवश्यकता नाही.’’

६ आ. आईला उलट उत्तर देणे चुकीचे असल्याचे लक्षात येऊन ते टाळणे आणि आईची क्षमा मागणे : पूर्वी मला त्रास झाला की, मी ‘ती दुखावली जाईल’, असे बोलायचे. त्यामुळे कधी-कधी तिलासुद्धा ‘मला उलट उत्तर देऊया किंवा उद्धटपणे बोलूया’, असे वाटायचे; पण तसे तिने कधीच केले नाही. ती नंतर येऊन माझी क्षमा मागायची. ती म्हणायची, ‘‘आई, माझ्या मनात वरील विचार येत होते; पण मग मी विचार केला, ‘आईला असे बोलणे चुकीचे आहे’; म्हणून मी शांत रहायला लागले. क्षमा कर.’’ यातून इतक्या लहान वयातही तिची प्रगल्भता दिसून येते. तिच्या मनात एक गोष्ट स्पष्ट आहे, ‘स्वभावदोष आणि अहं यामुळे मी देवापासून दूर जाईन. त्यामुळे मी ते घालवायलाच हवेत.’

७. लाड करून घेण्यासाठी सुटीत आजी-आजोबांकडे न जाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जाणे निवडणे

एकदा मी भक्तीला विचारले, ‘‘तुला सुटीत कुठे फिरायला जायचे आहे ? अहमदाबादला, पुण्याला कि रायगडला ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘शिवाजी महाराजांकडे जाऊया.’’ मी तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगते. त्या वेळी ती पुष्कळ प्रश्‍न विचारून सर्व समजून घेते. ‘या गोष्टींमुळेे तिच्या मनात देश आणि धर्म यांविषयीचा अभिमान वृद्धींगत झाला आहे’, असे वाटते. तिला छत्रपती शिवाजी महाराजांप्रती पुष्कळ आदर आहे. एकदा आम्ही तिला रायगडावर नेले होते. तेव्हा तिने सर्व रायगड चालत बघितला. तेथील ‘टकमक’ टोकावर गेल्यावर ‘येथूनच मावळे सर्व ठिकाणी लक्ष ठेवत असतील ना !’, असे वाटून तिची भावजागृती झाली. ती लहान असूनही आजी-आजोबांकडे, म्हणजे जिथे तिचे लाड होतात, तेथे न जाता तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्याकिल्ल्यावर जायचे निवडले.

८. परात्पर गुरुदेवांच्या सततअनुसंधानात असल्यामुळे पुष्कळ आनंदी असणे

भक्तीला परात्पर गुरुदेव पुष्कळ आवडतात. ती सतत भावप्रयोग करत असते. त्यात ती ‘सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांच्या खोलीत जाऊन त्यांना मनातील सर्व सांगणे, त्यांना नमस्कार करणे, त्यांना मिठी मारणे, त्यांच्या चरणांना स्पर्श करून रडणे, त्यांच्या खोलीच्या सज्जातील तुळशीला पाणी घालणे, त्यांच्याच खोलीत बसून जप करणे आणि अभ्यास करणे’, असा भाव ठेवते. त्यामुळे पुष्कळ वेळा तिचे परात्पर गुरुदेवांशी अनुसंधान असल्याचे मला जाणवते. बाह्यतः जरी ती बागडत वा उड्या मारत असली, तरी आतून ती वेगळ्याच विश्‍वात वावरत असते. त्यामुळे ती पुष्कळ आनंदी असते.

९. भाव

९ अ. आश्रमातील कार्यपद्धतींचे पालन करण्याचे महत्त्व सांगितल्यावर ‘सर्व साधकांमध्ये परात्पर गुरुदेव आहेत’, या भावाने कार्यपद्धतींचे पालन करणे : याआधी ती चप्पल न घालता प्रसाधनगृहात जायची. अशी चूक अनेकदा झाल्यामुळे मी तिला ‘कार्यपद्धतीचे पालन केल्याने आपली साधना कशी होते आणि गुरूंचा आश्रम आपला कसा वाटतो ?’, हे समजावून सांगितल्यावर तिची भावजागृती झाली. मी तिला समजावले, ‘‘तू प्रसाधनगृह वापरल्यानंतर परात्पर गुरुदेव ते वापरणार आहेत’, असा भाव ठेव. मग तू ते कसे ठेवशील ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘आई सर्व साधकांमध्येही परात्पर गुरुदेव आहेत ना !’’ त्या दिवसानंतर प्रसाधनगृह वापरल्यावर ती मला बोलावून म्हणते, ‘‘आई, बघ माझ्याकडून काही राहिले नाही ना ? ते आता स्वच्छवाटत आहे ना ?’’

९ आ. संत भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) भजनातील ओळींचा अर्थ समजून घेतल्यावर तिची भावजागृती होते आणि त्याच स्थितीत ती भजने म्हणत असते.

१०. स्वभावदोष : भीती वाटणे, हट्टीपणा आणि रागीटपणा.

‘देवा, असा दैवी जीव देऊन तू मला धन्य केले आहेस. तू आम्हाला पुष्कळ मोठी सेवा दिली आहेस. ही सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य दे. तिच्या माध्यमातून तू आम्हाला पुष्कळ आनंद दिला आहेस. भक्तीच्या रूपाने तू सतत माझ्या समवेत असतोस. त्यासाठी अनंत कोटी कृतज्ञता !’

– सौ. प्राची मेहता (आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०१९)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF