नीरव मोदी यांच्या विरोधात लंडनमधील न्यायालयाकडून अटक वॉरंट

नीरव मोदी यांना अटक होऊन त्यांना भारतात आणलेही जाईल; मात्र एवढा मोठा घोटाळा करून ते भारताबाहेर पळून कसे गेले ?, या प्रश्‍नाचे उत्तरही मिळायला हवे !

लंडन – पंजाब नॅशनल बँकेचे १३ सहस्र कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळून गेलेले हिरे व्यावसायिक नीरव मोदी यांच्या विरोधात लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे ‘त्यांना कधीही अटक होऊ शकते’, असे म्हटले जात आहे. यापूर्वी सीबीआयने इंटरपोल आणि युनायटेड किंग्डम प्रशासन यांच्याशी संपर्क करून नीरव मोदी यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तसेच भारताने ब्रिटनकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी केली आहे.

सध्या नीरव मोदी तेथे ऐषारामात रहात आहेत. ते लंडनमध्ये रहात असलेल्या सदनिकेचे मूल्य ७३ कोटी रुपये आहे. काही दिवसांपूर्वी येथील ‘दी टेलिग्राफ’ दैनिकाने ही माहिती प्रसिद्ध केली होती.


Multi Language |Offline reading | PDF