ख्रिस्ती असणार्‍या प्रियांका वाड्रा यांना काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी अनुमती देऊ नये !

वाराणसीमधील अधिवक्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  • लोकसभा निवडणुकीमुळे प्रियांका वाड्रा या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणार आहेत, हे हिंदूंना लक्षात आले आहे !
  • प्रियांका वाड्रा किंवा काँग्रेस यांनी हाती सत्ता होती त्या वेळी हे मंदिर संपूर्णपणे धर्मांधांच्या कह्यातून मुक्त करून त्याला मूळस्वरूप देण्याचा प्रयत्न का केला नाही ?, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा २० मार्चपासून ४ दिवसांच्या उत्तरप्रदेशच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या कालावधीत त्या काशीच्या विश्‍वनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. याला वाराणसी येथील अधिवक्त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन ‘प्रियांका वाड्रा यांना दर्शन घेण्यास अनुमती देऊन नये’, अशी मागणी केली आहे. या पत्रात, ‘काशी विश्‍वनाथ मंदिर सनातन धर्माच्या देवतांचे मंदिर आहे. प्रियांका वाड्रा ख्रिस्ती धर्मीय असल्याने त्यांनी तेथे जाऊ नये. त्यांनी चर्चमध्ये जावे’, असे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF