सीआरपीएफच्या पोलिसांचे हौतात्म्य देश विसरणार नाही ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

  • गेल्या ७१ वर्षांत हुतात्मा झालेल्यांना का विसरण्यात आले, हे कोण सांगणार ?
  • पोलीस आणि सैनिक देशासाठी हौतात्म्य पत्करतात, तर राजकारणी देशाला लुटतात !

गुरुग्राम (हरियाणा) – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील पोलिसांच्या हौतात्म्याला, त्यांच्या शौर्याला देश कधीही विसरणार नाही, विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी येथे केले.  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफच्या) ८० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अजित डोवाल यांनी मांडलेली सूत्रे ….

१. अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असते. दुसर्‍या महायुद्धानंतर ३७ देश उद्ध्वस्त झाले किंवा त्यांनी त्यांचे सार्वभौमत्व गमावले. यांमधील २८ देश उद्ध्वस्त होण्यामागील कारण हे त्यांच्या देशांतर्गत संघर्ष होते. ज्या देशाची अंतर्गत सुरक्षा दुर्बल असते तो देश दुबळा असतो. त्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे दायित्व सीआरपीएफवर येते.

२. कदाचित् लोक विसरले असतील की, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर संख्येने खूपच अल्प असतांनाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्त्वाची भूमिका बजावली त्यावर एक पुस्तक लिहिले जाऊ शकेल.


Multi Language |Offline reading | PDF