पाककडून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांचा छळ आणि हेरगिरी

भारताकडून विरोध आणि चौकशी करण्याची मागणी

‘नाक दाबले की तोंड उघडते’, या न्यायाने भारतानेही गांधीगिरी करत बसण्यापेक्षा पाकला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचे धाडस दाखवावे !

नवी देहली – इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांचा छळ आणि त्यांची हेरगिरी करण्यात येत असल्यावरून भारताने पाककडे विरोध दर्शवला आहे. तसेच या घटनांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील सर्व माहिती भारताने पाकला दिली आहे.

१. सूत्रांच्या माहितीनुसार पाकच्या सुरक्षा अधिकार्‍याने ९ आणि १० मार्च या दिवशी भारतीय उप उच्चायुक्तांचा पाठलाग करून त्यांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दूतावासातील अन्य अधिकार्‍यांचाही पाठलाग केला होता.

२. भारतीय उप उच्चायुक्तांच्या घराबाहेर पाकचा एक अधिकारी सतत लक्ष ठेवून असल्याचे आढळले होते. पाकचे २ अधिकारी भारतीय उच्चायुक्तांवरही लक्ष ठेवून असल्याचे आढळून आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF