चीनचा आतंकवादाला विळखा !

संपादकीय

चीनने देशातील आतंकवादाविरुद्ध अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनने वर्ष २०१४ पासून आतापर्यंत शिनझियांग प्रांतातील आतंकवाद्यांच्या १ सहस्र ५९९ टोळ्या संपवल्या असून १२ सहस्र ९९५ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सहस्रावधी स्फोटके जप्त केली आहेत. आतापर्यंत ३० सहस्र ६४५ लोकांना शिक्षा केली आहे. १८ मार्चला ही माहिती चीनकडून देण्यात आली. या संदर्भात काढलेल्या श्‍वेतपत्रिकेत ‘मानवी हक्कांचे संरक्षण, तसेच कट्टरपंथीय आणि आतंकवादविरोधात लढा’, असे म्हटले आहे. चीनने वर्ष २०१४ पासून म्हणजे भारतात नवे सरकार आल्याच्या कालावधीपासूनच आतंकवाद्यांविरुद्ध केलेली कारवाई निश्‍चितच अनुकरणीय आहे. आतंकवाद कसा नेस्तनाबूत करायचा, हे चीनने त्याच्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे भारतात जशा काही दिवसांच्या आड आतंकवाद्यांची घुसखोरी, मोठी आतंकवादी आक्रमणे, सैनिकांच्या हत्या होतात, त्या तेथे होत नाहीत. चीनने आतंकवादाचा ‘रंग’ ओळखला आहे. त्यामुळे तो ज्या रंगाच्या धर्मियांकडून केला जातो, त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. चीनने त्यांची लक्षावधी पुस्तके जप्त केली आहेत. त्यांच्या धर्मगुरूंवर कठोर निर्बंध लादले आहेत. अगदी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये घुसून कारवाई करण्यास चीन कचरत नाही. या धर्माच्या लोकांना कसे ताळ्यावर आणायचे याचा आदेशच सरकारी अधिकार्‍यांना देऊन तो न पाळल्यास अधिकार्‍यांवरही कारवाईचा बडगा चीन उगारतो. भारतात असे होते का ? भारतातील मदरसे आणि मशिदी हे आतंकवादाचे अड्डे असल्याचे अनेक पुरावे असतांनाही भारतात त्यांना टाळे ठोकली जात नाहीत. उलट त्यांच्या आधुनिकीकरणासाठी निधी देऊन आतंकवादाला खतपाणी घातले जाते. अशा धोरणांमुळेच भारतात आतंकवादाचा पूर्ण निःपात होऊ शकला नाही. या सर्व सूत्रांच्या पार्श्‍वभूमीवर आतंकवादाचा रंग न समजलेल्या भारतीय शासनकर्त्यांना चीनकडून बरेच काही शिकता येईल !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now