मागासवर्गीय तरुणांच्या साहाय्याने सरकार उलथवून टाकण्याचा शहरी नक्षलवादी विचारवंतांचा कट ! – पुणे पोलीस

मुंबई – सरकार उलथवून टाकणे, हा नक्षलवाद्यांचा हेतू आहे. तो पूर्ण करण्यासाठी शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेले विचारवंत हे मागासवर्गीय तरुणांना हाताशी धरून कट आखत आहेत, असा दावा पुणे पोलिसांनी नुकताच गोन्साल्विस आणि अरुण परेरा यांच्या जामिनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र सादर करतांना केला. या दोघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की,

१. परेरा यांच्यासह अटक केलेले विचारवंत हे बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) ज्येष्ठ सदस्य आहेत आणि सरकार उलथवून लावणे हा पक्षाचा हेतू असल्याने ते त्यासाठी आग्रही आहेत.

२. पक्षाचा हा हेतू साध्य करण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा ते अधिक संख्येने आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लोकांचा उपयोग करून घेत आहेत. मागासवर्गीय समाजाला हाताशी धरून त्यांच्यावर आजही अत्याचार होत आहेत, हे दाखवून देण्यासाठी ते सभा आयोजित करत आहेत.

३. ३१ डिसेंबर २०१७ या दिवशीच्या एल्गार परिषदेतही परेरा आणि अटकेत असलेले अन्य विचारवंत यांनी चिथावणीखोर भाषणे केली. त्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडल्या. या समाजामध्ये सरकारप्रती द्वेष निर्माण करून त्याद्वारे सरकार उलथवून लावण्याचा या विचारवंतांचा कट होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now