न्यूझीलंडमधील उद्रेक !

न्यूझीलंडमधील २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारामुळे जगभरात सर्वांना धक्का बसला आहे. ‘असे कृत्य कोणी तरी करील’, यावर अनेकांचा विश्‍वास नसल्याचे प्रसारमाध्यमांतून आलेल्या प्रतिक्रियांमधून समोर येत आहे. अशी ही अनपेक्षित घटना घडली आहे. हे कृत्य करणारा ब्रेन्टन टॅरॅन्ट हा ब्रिटीशवंशीय आणि जन्माने ऑस्ट्रेलियाचा नागरिक असणारा २८ वर्षीय तरुण आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. म्हणजेच पहिल्यांदाच त्याने एखादा गुन्हा केला आहे. त्याने हे कृत्य नियोजनबद्धरित्या केले आणि सर्वांना उघडपणे दाखवत केले आहे. या कृत्याच्या पूर्वीच त्याने ‘तो असे काही करणार आहे’, याची फेसबूकच्या माध्यमातून लोकांना कल्पना दिली आणि गोळीबार करतांना स्वतःच्या शर्टाला कॅमेरा लावून त्याचे चित्रीकरण थेट फेसबूकवर प्रक्षेपित केले. तसेच या कृत्याच्या पूर्वीच त्याने ‘तो हे कोणत्या कारणामुळे करत आहे’, याचा एक जाहीरनामाही (‘मॅनेफेस्टो’ही ) प्रसारित केला होता. यावरून तो आतंकवादी आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल; कारण ‘आतंकवाद्यांच्या कारवाया अशा नसतात’, हे लक्षात घ्यायला हवे. टॅरॅन्टनेही ‘या कृत्याला आतंकवादी कृत्य म्हटले जाईल; मात्र ही विरोधाची कृती आहे’, हेच सांगितले आहे. त्यामुळे याचा तसा विचार होणे आवश्यक आहे. टॅरॅन्टच्या कृतीमागील त्याने दिलेली कारणे समजून घ्यावी लागतील.

युरोपमधील अत्याचारग्रस्त ख्रिस्ती !

टॅरॅन्टच्या जाहीरनाम्यानुसार तो श्‍वेत नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो आणि ‘अश्‍वेतांकडून, तसेच स्थलांतरितांकडून (मुसलमानांकडून) युरोपमध्ये स्थानिक श्‍वेत ख्रिस्ती नागरिकांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत’, असा तो आरोप करत आहे. टॅरॅन्ट याच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. सीरियामधील इस्लामिक स्टेटच्या आतंकवादामुळे सहस्रावधी मुसलमानांनी पलायन करून युरोपमधील देशांत आश्रय घेतला आहे. युरोपमधील देशांनीही बंधुत्वाचा भाव ठेवत त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र शरणार्थी धर्मांधांची मानसिकता पहाता, याचा या स्थानिक श्‍वेत ख्रिस्त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ३ वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरच्या रात्री जर्मनीमध्ये या शरणार्थी धर्मांधांकडून स्थानिक ख्रिस्त्यांवर आक्रमणे झाली, अनेक तरुणींवर बलात्कार झाले. त्यानंतर युरोपमधील अनेक देशांत अशा प्रकारची आक्रमणे प्रतिदिन घडू लागली. नॉर्वेमध्ये ख्रिस्ती तरुणी या मुसलमानांंच्या टोळक्यांपासून स्वतःचे रक्षण व्हावे, म्हणून हिजाब घालून बाहेर पडतात. या मुलींनी‘ त्या मुसलमान असल्याचे भासवले’, तर त्यांना या टोळक्यांकडून त्रास होणार नाही, ही सध्याची स्थिती आहे. अशा घटनांमुळे जर्मनीत शरणार्थींना मोठा विरोध होऊ लागला आहे. त्याविरोधात चळवळही चालू झाली आहे. शरणार्थींमुळे मूळ युरोपियन संस्कृतीवर फार मोठे सांस्कृतिक आक्रमण झाल्याची भावना तेथे मूळ धरू लागली आहे. फ्रान्समध्ये युरोपमधील सर्व देशांच्या तुलनेत अधिक मुसलमान आहेत. तेथे नेहमीच दंगली होत असतात, असा अनुभव आहे. आता अशी स्थिती संपूर्ण युरोपमध्ये पुढील काही वर्षांत होण्याच्या शक्यतेने श्‍वेत ख्रिस्त्यांना भीती वाटू लागली आहे आणि हीच भीती टॅरॅन्टने त्याच्या जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. काही राजकीय आणि सामाजिक विश्‍लेषक युरोपमधील स्थितीचा अभ्यास करतांना त्यांनाही यापूर्वी कुठेतरी असे वाटलेच असेल की, ज्या प्रकारे टॅरॅन्टकडून आक्रमण झाले, तसे आक्रमण युरोपमध्ये कुठेतरी होऊ शकते. प्रत्यक्षात युरोपमध्ये असे कुठे कृत्य झाले नसले, तरी युरोपमधील काही मशिदींमध्ये दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, याकडे लक्ष द्यावे लागेल.

वर्णद्वेष नव्हे, तर धर्मद्वेष !

यापूर्वी काही शतकांमध्ये युरोप आणि अमेरिका येथे श्‍वेत-अश्‍वेत असा वर्णद्वेष मोठ्या प्रमाणावर होता. अजूनही तो पूर्णपणे संपलेला नाही. अमेरिकेत वर्णद्वेषातून हिंसाचाराच्या घटना अद्यापही घडत असतात; मात्र टॅरॅन्टच्या कृत्यातून आता या वर्णद्वेषाला धर्मद्वेष जोडलेला आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याने मशिदींवर आक्रमण केले. या मशिदींमध्ये तुर्कस्थान, भारत, मलेशिया, सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तान या देशांतील मुसलमान नमाजपठणासाठी आले होते. तसेच बांगलादेशाच्या क्रिकेट संघातील क्रिकेटपटूही येथे येत होते. टॅरॅन्टने वारही शुक्रवार निवडला आणि गोळीबार केला. हे मशिदींतील सर्व मुसलमान अश्‍वेत होते; मात्र येथे ते अश्‍वेत आहेत, हाच धागा नव्हता, तर ते मुसलमान होते, हे ठरवून गोळीबार केला. त्याने अश्‍वेत असणार्‍या स्थलांतरित ख्रिस्त्यांवर किंवा ते जात असलेल्या एखाद्या चर्चमध्ये रविवारी आक्रमण केले नाही. हे लक्षात घ्यायला हवे. त्याच्या या कृत्याचे कधीही आणि कोणीही समर्थन करणार नाही अन् करताही येणार नाही; मात्र जेव्हा अशी घटना घडते तेव्हा त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात जिहादी आतंकवाद वाढला’, असे भारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि पुरोगामी म्हणत असतात. अनेकदा जिहादी आतंकवाद्यांना पकडल्यावर ते गुजरात दंगलीचा आणि बाबरीचा सूड घेण्यासाठी आतंकवादी कृत्य केल्याचे म्हणतात. तेव्हा आता टॅरॅन्टने त्याचे विचार सांगितल्यावर त्याचाही अभ्यास व्हायला हवा. युरोपमध्ये श्‍वेत ख्रिस्त्यांना जे भोगावे लागत आहे, त्याची चर्चा होणे आता आवश्यक झाली आहे. भारतात हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा काँग्रेसींकडून प्रयत्न झाला; मात्र हिंदू कधी आतंकवादी झाले नाहीत किंवा त्यांनी कधी टॅरॅन्टसारखी कृती केली नाही, हेही लक्षात घ्यायची आवश्यकता आहे. काश्मीरमधून हिंदूंचा निर्वंश झाला. त्यांना तेथून हाकलण्यात आले, तरीही हिंदू शांत राहिले; मात्र टॅरॅन्टसारखे तरुण गप्प का बसू शकत नाहीत, याचाही विचार होणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF