(म्हणे) ‘लोकांनी केवळ श्रद्धेचा बुरखा पांघरला आहे !’- वैभव मांगले

कुठे हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाकडे आकर्षित होऊन संशोधन आणि आचरण करणारे जिज्ञासू वृत्तीचे विदेशी, तर कुठे काडीमात्र अभ्यास न करता देव आणि धर्म यांवर टीका करणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

कलाकार वैभव मांगले

पुणे – देव अस्तित्वात नाही, हे पुजार्‍याला ठाऊक असते. त्यांच्यासाठी ते केवळ पैसे कमवण्याचे साधन आहे; म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात, असे हिंदुद्वेषी विधान कलाकार वैभव मांगले यांनी केले. (उचलली जीभ लावली टाळ्याला ! अपवादाकडे नियम म्हणून पहाणारे वैभव मांगले ! ईश्‍वराची पदोपदी अनुभूती घेणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी वैभव मांगले यांचे काय मत आहे ? – संपादक) शहीद भगतसिंह विचार मंचच्या वतीने आयोजित सहाव्या नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते. (भगतसिंहांच्या आडून नास्तिकतेचा प्रसार करू पहाणार्‍या संघटनांपासून जनतेने सावध रहावे. – संपादक)

ते पुढे म्हणाले, ‘‘अज्ञान मान्य करणे, हा विज्ञानाचा आधार आहे. धर्म मात्र अज्ञानच मान्य करायला सिद्ध नाही. देवस्थानाला मोठमोठे व्यापारी लोक जातात आणि बोली लावतात, ते देवाला चालते का ? (आज लूटमार, चोर्‍या, भ्रष्टाचार हे सर्वत्र बोकाळले आहे. हे संविधानाला चालते का, असा उद्या कुणी प्रश्‍न विचारला तर ? काही तरी बादरायण संबंध लावून देवाचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न करणे हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. – संपादक) जीवनातील प्रत्येक गोष्टीत तर्क असतो. तो शोधायला आपण लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. गाय मारली म्हणून माणसाची हत्या होणे, ही असहिष्णुता आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF