केरळमधील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत अल्पसंख्यांकांचे वर्चस्व हा हिंदुत्वाला धोका !

१. अल्पसंख्यांकांचे नियंत्रण असलेल्या बहुसंख्य महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना हिंदुविरोधी शिकवण

‘समाजावर नियंत्रण असणारे सर्वांत शक्तीशाली क्षेत्र म्हणजे शिक्षण ! सध्या केरळमधील शिक्षण क्षेत्र अल्पसंख्यांकांच्या नियंत्रणाखाली आहे. अल्पसंख्यांकांपैकी अनिवासी भारतीय करत असलेल्या मोठ्या अर्थसाहाय्यामुळे अल्पसंख्यांक आर्थिकदृष्ट्या सबळ असून राजकीयदृष्ट्याही हिंदूंपेक्षा वरचढ आहेत. केरळमध्ये अल्पसंख्यांकांकडून चालवल्या जाणार्‍या शाळांची संख्या ३ सहस्र ३४० असून केवळ १९४ शाळा हिंदूंकडून चालवल्या जातात. कला आणि शास्त्र या विषयांच्या महाविद्यालयांपैकी २२३ महाविद्यालये मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्याकडून चालवली जातात, तर हिंदूंकडून केवळ ४२ महाविद्यालये चालवली जातात. ४३३ व्यावसायिक महाविद्यालयांपैकी ८६ महाविद्यालये शासनाकडून चालवली जातात, ८९ महाविद्यालये हिंदूंकडून चालवली जातात, तर २५८ महाविद्यालये अल्पसंख्यांकांकडून चालवली जातात. अल्पसंख्यांकांना त्यांच्या संस्थांमधून त्यांच्या धर्माविषयी शिक्षण देण्याची सवलत आहे; परंतु हिंदूंच्या संस्थांमधून ती सवलत नाही. उलट अल्पसंख्यांकांच्या संस्थांमधून शिक्षण घेणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचा अभ्यास करण्याची सक्ती केली जाते आणि या शिक्षणामुळे त्यांच्या मनात हिंदुविरोधी विचार रुजवले जातात. केरळमधील शिक्षणव्यवस्था हा निधर्मी लोकशाहीचा उत्तम नमुना आहे.

२. शासनाकडून अल्पसंख्यांकांच्या महाविद्यालयांना अधिक साहाय्य

केरळमधील हिंदू हा आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित गट आहे. ‘भारतावर यहुदी लोकांनी केलेल्या आक्रमणामुळे भारतीय संस्कृती नष्ट झाली’, असे इतिहासात सांगितले जाते. केरळमधील परिस्थिती याहून वेगळी नाही. राज्याच्या तिजोरीतील प्रमुख भाग शिक्षणावर खर्च केला जातो. केरळमध्ये मागील ४८ वर्षांत केवळ एक हिंदु शिक्षणमंत्री होता; तेही केवळ ४ वर्षे ३ महिन्यांच्या कालावधीसाठी ! उरलेल्या सर्व कालावधीत या खात्यावर मंत्री म्हणून अल्पसंख्यांकच होते. या सर्व शिक्षणमंत्र्यांनी अल्पसंख्यांकांच्या व्यवस्थापनांना सर्व प्रकारचे साहाय्य केले आहे. उजव्या आणि डाव्या आघाडीच्या शासनामध्ये अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी अल्पसंख्यांकांच्या संस्थांना अधिक प्रमाणात साहाय्य करण्यात आले आहे. केरळ राज्यातील एक लक्ष ९९ सहस्र शिक्षकांपैकी केवळ ३८ टक्के हिंदु शिक्षक आहेत. १९९७ या वर्षीच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये १४ सहस्र २०० महाविद्यालयीन शिक्षक होते आणि त्यांपैकी ७६ टक्के अल्पसंख्यांक होते. या सर्व आकडेवारीवरून केरळमधील हिंदू उपेक्षित आहेत, हे लक्षात येते.

३. सर्वच क्षेत्रांत हिंदूंची होत असलेली पिछेहाट !

आरोग्य क्षेत्रातही अल्पसंख्यांक हे हिंदूंच्या वरचढ आहेत. केरळमध्ये अल्पसंख्यांकांनी चालवलेली ९२८ रुग्णालये आहेत, तर हिंदूंनी चालवलेली केवळ १० रुग्णालये आहेत. उद्योग, शेती आणि व्यापार यांमध्ये हिंदूंचा वाटा अनुक्रमे २८, २४, आणि २८ टक्के आहे. मुसलमानांचा वाटा अनुक्रमे ३०,२३ आणि ४० टक्के आहे आणि ख्रित्यांचा वाटा ३५, ४० आणि ३६ टक्के आहे. जगातील अन्य कुठल्याही जाती किंवा धर्मापेक्षा केरळमधील हिंदूंची अधिक प्रमाणात उपेक्षा होत आहे. कित्येक क्षेत्रात हिंदूंची पिछेहाट होत आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये मात्र हिंदू अग्रेसर आहेत !’

– डॉ. डी.सी. इसॉक


Multi Language |Offline reading | PDF