सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे मशिदीच्या प्रवेशद्वारावर चारचाकी गाडी धडकली

(प्रातिकात्मक चित्र)

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता ऑस्ट्रेलियातील क्विन्सलॅण्डमध्ये १७ मार्च या दिवशी एका २३ वर्षीय चारचाकी चालकाने मशिदीच्या प्रवेशद्वारावर गाडी धडकवली. तसेच नंतर मशिदीत नमाज पढणार्‍या मुसलमानांना उद्देशून आक्षेपार्ह विधाने केली. त्याच वेळी पोलिसांनी या तरुणाला अटक केली.

या तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला आदल्या दिवशी पकडले होते. त्याचे रक्त पडताळल्यावर त्याने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याला कारागृहात डांबले. त्यानंतर १७ मार्चला त्याला सोडण्यात आले; मात्र कारागृहातून बाहेर येताच त्याने चारचाकी चालवत मशिदीच्या प्रवेशद्वाराला धडक दिली.


Multi Language |Offline reading | PDF