गोळीबारकर्त्याचा अधिवक्ता घेण्यास नकार; स्वतःच युक्तीवाद करणार

न्यूझीलंडच्या मशिदींमधील गोळीबार

ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) – येथील २ मशिदींमध्ये गोळीबार करून ५० जणांना ठार करणारा ब्रेन्टेट टॅरॅन्ट याने खटला लढवण्यासाठी अधिवक्ता घेण्यास नकार दिला असून तो स्वतःच युक्तीवाद करणार असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने त्याला अधिवक्ता दिला होता आणि त्याने पहिल्या दिवशी बाजूही मांडली होती; मात्र नंतर टॅरॅन्ट याने अधिवक्ता घेण्यास नकार दिला आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF