देहलीमध्ये निवडणूक आयोगाने मशिदींमध्ये विशेष पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी ! – भाजप

‘आप’च्या नेत्यांकडून मशिदींत जाऊन धर्माच्या नावाने मत मागण्याचा प्रयत्न

  • एरव्ही स्वतःला ‘निधर्मी’ म्हणवून घेणारेे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी पक्ष निवडणुकीच्या काळात मात्र मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
  • अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने बंदीच घातली पाहिजे !

नवी देहली – लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना धर्माच्या नावावर प्रभावित करण्याची शक्यता असल्यामुळे भाजपने देहलीच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे मशिदींमध्ये पर्यवेक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात भाजपचे देहलीतील कायदे विभागाचे संयोजक नीरज यांनी याविषयी पत्र लिहून मागणी करतांना आरोप केला आहे की, आपच्या नेत्यांनी मशिदींमध्ये जाऊन धर्माच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF