(म्हणे) ‘मनोहर पर्रीकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी !’ 

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड बरळले !
  • एक माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या मृत्यूविषयी असे वादग्रस्त विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पहात आहेत, हे न समजायला जनता दूधखुळी नाही !

मुंबई – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या वेळी आव्हाड यांनी ‘गेलेल्या माणसाविषयी वाईट बोलू नये; पण हे वास्तव आहे’, अशीही पुस्ती जोडली आहेे. आव्हाड पुढे म्हणाले, ‘‘राफेलची बोलणी चालू झाल्यानंतर पर्रीकर अस्वस्थ झाले. देहलीचे राजकारण आपल्याला जमणार नाही, हे त्यांनी ओळखले. त्याचमुळे त्यांनी गोव्यात परतून मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातील वेदना त्यांनी अनेक मित्रांना बोलून दाखवल्या होत्या.’’


Multi Language |Offline reading | PDF