(म्हणे) ‘देव लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तर एक खासदार कसे पूर्ण करणार ?’

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री महेश शर्मा यांचे अज्ञानमूलक विधान !

  • देव भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करतो; मात्र त्याच वेळेस तो भक्ताच्या प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही. त्याला ते सहन करण्याची शक्ती देतो; मात्र हे अध्यात्मशास्त्र भाजपच्या मंत्र्यांना धर्मशिक्षण नसल्याने कसे कळणार ? त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या मंत्र्यांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना धर्मशिक्षण दिल्यास ते अशा प्रकारे त्यांचे अज्ञान प्रकट करणार नाहीत !
  • लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे जनतेने धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध झाल्यास हिंदु राष्ट्रामध्ये सर्वांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती साधता येईल !
  • स्वतःची निष्क्रीयता लपवण्यासाठी देवाला मधे आणून अशा प्रकारची विधाने करणार्‍या मंत्र्यांना हिंदूंनी मतपेटीद्वारे धडा शिकवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – आपण सर्व देवाची मुले आहोत. देवाने आपल्याला पृथ्वीवर पाठवले आहे, तर त्याचेच दायित्व आहे की, आपल्यासाठी अन्न, कपडे, घर, रोजगार आणि आमच्या मुलांचे शिक्षण यांची त्याने व्यवस्था करावी. आज पूर्व उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यासहित अन्य जिल्ह्यांतील लोकांना पोटभर जेवण मिळत नाही. लहान मुले जेव्हा शाळेत जातात तेव्हा माध्यान्ह भोजन करून पोट भरतात, अन्य लोक मात्र उपाशीच रहातात. (याला गेली ७१ वर्षे देशात आणि राज्यात सत्ता भोगणारे राज्यकर्तेच उत्तरदायी आहेत ! त्यांच्या कर्मदरिद्रतेमुळे त्यांनी जनतेकडून कर घेतला; मात्र त्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध केल्या नाहीत ! – संपादक) जेव्हा देवच लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तर एक खासदार कसा करू शकतो ?, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री महेश शर्मा यांनी येथील भजनलाल मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना केल्याची एक ध्वनीचित्रफीत समोर आली आहे.

शर्मा यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका होऊ लागल्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष हिमांशु मित्तल म्हणाले की, शर्मा हे कार्यकर्त्यांना समजावत होते; मात्र वृत्त देतांना ते चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहे. (मंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी अशी विधाने करणारे पक्षाचे पदाधिकारी ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now