महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर ८० लाख रुपये जप्त

पैसे वाटून लोकप्रतिनिधी निवडून आणणारी आणि निवडणुका निरर्थक ठरवणारी लोकशाही आता पुरे ! लोकशाहीतील अपप्रकार थांबण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

नागपूर – रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या सावनेर विधानसभा मतदारसंघातील सिरोंजी तपासणी नाका येथे सुरक्षापथकाने वाहनांची पडताळणी करतांना २ चारचाकी वाहनांतील ८० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणांत दोन्ही गाड्यांच्या चालकांना कह्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम पुढील पडताळणीसाठी आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे. ही रक्कम कुणी आणि कशासाठी येथे पाठवली होती, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करायला प्रारंभ झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF