नवघर परिसरात दरोडे आणि घरफोड्या करणारी धर्मांधांची टोळी अटकेत

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !

ठाणे, १७ मार्च (वार्ता.) – नवघर येथील इंद्रलोक ते कनकीया रोड परिसरातील शिववंदना इमारतीतील धनलक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा घालण्यासाठी आलेल्या धर्मांधांच्या टोळीला नवघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. त्यांच्याकडून लोखंडी गावटी कट्टा, तीन राऊंड, पक्कड, स्क्रूड्राईव्हर, नायलॉनची रस्सी, धारधार हत्यारे, मिरची पूड, दोन दुचाकी आणि छोटा गॅसकटर जप्त करण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वी गॅसकटरचा वापर करून दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे मान्य केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF