काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस हारुण खतीब यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद

मिरज, १७ मार्च (वार्ता.) – मिरज रेल्वेस्थानकात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय चालू करण्यासाठी हारुण खतीब याने महादेव कांबळे याच्याकडून पाच लक्ष रुपयांची खंडणी मागितली, अशी तक्रार खाद्यपदार्थ विक्रेता शमशुद्दीन काझी याने गांधी चौक पोलीस ठाण्यात दिले होते. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्यात काँग्रेस शहरजिल्हा सरचिटणीस हारुण खतीब आणि महादेव कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गांधी चौक पोलीस याचे अन्वेषण करत आहे.


Multi Language |Offline reading | PDF