मंत्रालयात अभ्यागतांसाठी चिकित्सालय चालू करणार

मुंबई – विविध शासकीय कामकाजासाठी राज्यभरातून अभ्यागत मंत्रालयात येतात. त्यांना मंत्रालयात आपत्कालीन वैद्यकीय साहाय्य कधीही लागू शकते, यासाठी येथे चिकित्सालय चालू करण्यात आले आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मंत्रालयाच्या इमारतीबाहेर हा दवाखाना हालवण्यात आला होता; तथापि मंत्रालयाच्या विस्तार इमारतीच्या तळमजल्यावरील जागा दवाखान्यासाठी देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF