मलबार हिल (मुंबई) येथे पाण्याच्या चेंबरमध्ये बुडून कर्मचार्‍याचा मृत्यू, शोधण्यासाठी गेलेले चार जण बेशुद्ध

राकेश निजप

मुंबई – मलबार हिल येथे जलवाहिनी चालू करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या एका महानगरपालिका कर्मचार्‍याचा चेंबरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कर्मचार्‍याला शोधण्यासाठी चार कर्मचारी या चेंबरमध्ये उतरले होते; मात्र तेही तिथे पाण्यात फसले. या चेंबरमध्ये फसून राकेश निजप याचा मृत्यू झाला असून इतर चार जण बेशुद्ध अवस्थेत सापडले आहेत. मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात नाना चौकमध्ये घडलेल्या या दुर्घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.

रात्री तीन वाजता भायखळा येथील पाणी खात्यातील पाच कर्मचारी पाणी चालू करण्यासाठी नाना चौक येथे आले होते. या पाच कर्मचार्‍यांमधील राकेश पाणी चालू करण्यासाठी चेंबरमध्ये उतरला होता. बराच विलंब होऊनही राकेश चेंबरच्या बाहेर न आल्याने अन्य ४ जण त्याला शोधण्यासाठी चेंबरमध्ये उतरले; मात्र पाण्यात बुडाल्याने राकेशला शोधणे कठीण झाले होते. जवळपास अर्ध्या घंट्याच्या अथक प्रयत्नानंतर राकेशचा मृतदेह आणि इतर चार जणांना बेशुद्ध अवस्थेत चेंबरमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना नायर रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF