सनातन संस्थेचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांना सूचना

या वर्षी २० मार्चला होळी आणि २५ मार्चला रंगपंचमी आहे. या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने होळी आणि रंगपंचमी या सणांचे महत्त्व सांगणारे १५ मिनिटे कालावधीचे प्रत्येकी दोन दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग मराठी आणि हिंदी भाषांत, तसेच १ सत्संग कन्नड भाषेत सिद्ध करण्यात येत आहेत. हे सत्संग सिद्ध झाल्यावर जिल्ह्यांना पाठवण्यात येतील. आपल्या जिल्ह्यात या सत्संगांचे अधिकाधिक प्रसारण करण्यासाठी जिल्हासेवक आणि समिती समन्वयक यांनी नियोजन करावे. सत्संगांच्या प्रसारणानंतर त्याचा आढावाही पुढील संगणकीय पत्त्यावर पाठवावा. हे सत्संग मिळण्यात काही अडचणी असल्यास सौ. वृंदा मराठे यांच्याशी [email protected]  या इमेल पत्यावर संपर्क करावा, अन्य कुठेही करू नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now