भारत आणि पाक यांच्यामध्ये बालाकोटवरून होणारे युद्ध अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर टळले !

‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेचा दावा

वर्ष २००१ मध्ये संसदेवरील आतंकवादी आक्रमणानंतरही भारत पाकवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असतांना अमेरिकेने खोडा घालून भारताला माघार घेण्यास भाग पाडले होते आणि आताही तसेच झाले आहे. यावरून अमेरिकेला ‘भारताने पाकवर कारवाई करू नये’, असेच वाटत आहे. त्यामुळे भारत अजून किती दिवस अमेरिकेच्या दबावात रहाणार, हे ठरवावे लागेल !

नवी देहली – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकच्या बालाकोट येथील जैश-ए-महंमदच्या तळावर केलेल्या कारवाईनंतर भारत आणि पाक यांच्यात युद्ध होणार होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी दिली होती; मात्र अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर युद्ध टळले, असे वृत्त ‘रॉयटर’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन

१. रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्यासमवेत अमेरिकेच्या अन्य अधिकार्‍यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर हे युद्ध टळले.

२. या वृत्तानुसार अमेरिका, पाक आणि भारत येथील सूत्रांच्या हवाल्याने भारताने अल्पाधिक अल्प ६ क्षेपणास्त्र डागण्याची धमकी दिली होती. त्यावर पाकने ३ पट अधिक क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी दिली होती.

३. भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकने पकडल्यावर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकची गुप्तचर संघटना आयएस्आयचे प्रमुख आसिम मुनीर यांना दूरभाष करून, ‘विंग कमांडर अभिनंदन तुमच्या कह्यात असले, तरी आम्ही आतंकवादविरोधी कारवाई रोखणार नाही. भारताची लढाई पाकमधून चालणार्‍या आतंकवादी संघटनांच्या विरोधात आहे’, असे सांगितले होते, असेही वृत्तात म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now