केरळमध्ये १९ वर्षांखालील २२ सहस्र मातांमध्ये १७ सहस्र माता मुसलमान !

  • केरळची हीच का ती साक्षरता ? एरव्ही हिंदूंना छोट्या कुटुंबाचे धडे देणारे सरकार मुसलमानांना असे धडे देण्यास मागे का रहाते ? भारतातील कायदे आणि नियम केवळ हिंदूंसाठी आहेत का ?
  • अल्प वयोगटातील मुलींचा विवाह लावून देणे कायद्याने गुन्हा असतांना अशांचा विवाह  होऊन त्यांना मुले होईपर्यंत कम्युनिस्ट सरकार झोपले होते का ?
  • अशामुळे केरळमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • अशा प्रकारे वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजप सरकार कधी प्रयत्न करणार ?    

थिरूवनंतपूरम् – केरळ राज्य देशात सर्वाधिक साक्षरतेच्या प्रमाणासाठी प्रसिद्ध आहे. आता हे राज्य १९ वर्षांखालील मोठ्या प्रमाणात माता असलेल्या महिलांचे राज्य झाले आहे. केरळमध्ये १९ वर्षांखालील २२ सहस्र ५५२ तरुणी माता बनल्या आहेत. या आकडेवारीतून राज्यात बालविवाहाचा प्रभाव आजही असल्याचे दिसून आले. राज्याच्या अर्थ आणि सांख्यिकी (आकडेवारी) खात्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

१. वर्ष २०१७ मध्ये केरळ राज्यात जन्माला आलेल्या एकूण बालकांपैकी ४.४८ टक्के बालकांच्या माता १५ ते १९ या वयोगटातील आहेत. या वयोगटातील शहरी भागातील मातांनी १६ सहस्र ६३९ बालकांना जन्म दिला, तर ग्रामीण भागातील मातांनी ५ सहस्र ९१३ बालकांना जन्म दिला.

२. १५ ते १९ वयोगटातील एकूण मातांपैकी १७ सहस्र ८२ माता मुसलमान आहेत, ४ सहस्र ७३४ हिंदू आहेत, तर ७०२ ख्रिस्ती आहेत. याच वयोगटातील बर्‍याच मातांनी २ – ३ मुलांना जन्म दिल्याचेही या अहवालात म्हटले आहे. (केरळमध्ये मुसलमानांची लोकसंख्या जलदगतीने का वाढते, हे यातून दिसून येते ! – संपादक)  

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now