साकळी (जळगाव) येथील दंगलीतील आरोपींना शरण येण्याचे पोलिसांचे आवाहन !

…अन्यथा घरात घुसून कह्यात घेऊ ! – पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे

इतके दिवस पोलीस का थांबले आहेत ? पोलिसांनी पूर्वीच आरोपींना कह्यात का घेतले नाही ? गावातील दंगलीतील ४७ धर्मांध आरोपींपैकी काही आरोपींनाच अटक झाली, अन्य आरोपी दीड मासापासून मोकाट का फिरत आहेत ? याचे उत्तर उपअधीक्षकांनी जनतेला द्यायला हवे !

जळगाव – साकळी येथे २६ जानेवारीला घडलेल्या दंगलीनंतर अद्यापही त्यातील बरेच आरोपी पकडले गेलेले नाहीत. साकळी दंगलीतील आरोपींनी स्वतःहून पोलिसांना शरण यावे, अन्यथा पोलीस प्रशासन त्यांच्या घरात घुसून त्यांना कह्यात घेईल, अशी चेतावणी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिली आहे. साकळी येथे शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले, ‘‘साकळीतील मुख्य चौकात, तसेच आवश्यक त्या ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. (पोलीस प्रशासनाची सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कृती म्हणजे ‘साप गेल्यावर लाठी मारण्याचा’च प्रकार म्हणावा लागेल ! – संपादक) कोणत्याही स्थितीत गावातील शांतता अन् सलोखा जपण्यास प्राधान्य असेल.

या प्रकरणातील मोकाट आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी साकळी ग्रामस्थांच्या वतीने ९ मार्चला नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now