यावल (जळगाव) येथे अल्पवयीन मुलीस पिस्तुलचा धाक दाखवत प्रेम करण्याची धमकी !

धर्मशिक्षणाच्या अभावाचे दुष्परिणाम !

जळगाव – यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका अल्पवयीन मुलीच्या डोक्याला पिस्तूल लावत, ‘‘तू माझी आहेस, माझ्यावरच प्रेम कर, तू माझी न झाल्यास तुला गोळी घालीन’’ अशी धमकी गिरीश लोहार या युवकाने तिला दिली. यामुळे भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १३ मार्चला तिने या मुलाच्या धमकीविषयी कुटुंबियांना माहिती दिली. तिच्या कुटुंबियांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी गावठी पिस्तुलासह चौघांना कह्यात घेतले. या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील अन्वेषण चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF