‘मोदी’ शब्दाचा अर्थ ‘मसूद, ओसामा, दाऊद, आयएस्आय’, असा आहे ! – काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचे विधान

  • काँग्रेसचे नेतेच जेथे आतंकवाद्यांना अझहरजी, ओसामाजी, हाफीजजी असे आदरार्थी संबोधतात तेथे त्यांना इतरांच्या नावांचा असा अर्थ लावण्याचा काय अधिकार ?
  • मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, फारूख अब्दुल्ला आदींवर देशद्रोही विधानांवरून देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबण्याचे धाडस करू न शकणारा भाजप निदान मोदी यांच्याविषयी अशा प्रकारचे विधान केलेल्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबण्याचे धाडस तरी करील का ?

नवी देहली – ‘मोदी’ (Modi) या शब्दाचा अर्थ मसूद (M), ओसामा (O) दाऊद (D), आयएसआय (I) असा आहे’, असे विधान काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात केले. त्याला भाजपने विरोध केला आहे.

या चर्चेत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हेही सहभागी होते. त्यांनी पवन खेडा यांच्या वक्तव्यवर आक्षेप घेत म्हटले की, ‘हे आक्षेपार्ह विधान आहे. देशाच्या पंतप्रधानांची तुलना तुम्ही ओसामा बिन लादेनसमवेत कशी करू शकता ? तुम्ही क्षमा मागितली पाहिजे.’ भाजपने नंतर ट्वीट करूनही याचा विरोध केला आहे. यात म्हटले आहे की, ‘आपल्यालाजवळ काँग्रेस असतांना पाकिस्तानसारख्या शत्रूची आवश्यकता काय आहे?’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now