भ्रष्टाचारामुळे मेटाकुटीस आलेल्या एका व्यक्तीची कथा आणि व्यथा !

‘चाकरीत माझे एका ठिकाणाहून स्थानांंतर (बदली) होऊन २ वर्षे झाली. यापूर्वी मी ज्या ठिकाणी होतो, तिथे असतांना मला कटु अनुभवातून जावे लागले. मी स्वच्छ चरित्र असलेला माणूस आहे. मला मिळणार्‍या वेतनाच्या व्यतिरिक्त अन्य पैशाला मी हात लावत नाही. त्यामुळे माझ्या सहकार्‍यांकडून आणि वरिष्ठांकडून मला त्रास देण्यात येत असे. एकदा तर मला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्याविषयी मी पोलिसात तक्रार केली होती; परंतु त्याचा काहीही लाभ झाला नाही. शेवटी कंटाळून मी अन्य ठिकाणी स्थानांंतरासाठी (बदलीसाठी) आवेदन पत्र (अर्ज) दिले. सुदैवाने माझे स्थानांंतर (बदली) झाले. जागा पालटली; पण परिस्थिती तशीच होती. मला या सर्व परिस्थितीचा मानसिक त्रास पुष्कळ होत असे. राहून राहून माझ्या मनात पुढील दोन प्रश्‍न येेतात.

१. ‘हे असे का ? जगात वाईट वागणारी व्यक्ती एवढी सुखात कशी रहाते आणि त्यांना काहीच त्रास कसे होत नाहीत ?

२. मी एवढा चांगला असूनही मलाच त्रास का ?’

(संदर्भ : ‘मनशक्ती’, मार्च २००५)


Multi Language |Offline reading | PDF