तीर्थक्षेत्र हरिद्वार येथे बंदी घालण्यात आलेल्या परिसरात ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ या अन्नपदार्थ वितरण करणार्‍या आस्थापनांकडून मांसाहाराचे वितरण

उत्तराखंड सरकारकडून दोन्ही आस्थापनांना नोटीस

हिंदूंच्या धर्माचा जाणीवपूर्वक अवमान केला; म्हणून या अशा आस्थापनांचे परवाने रहित करून उत्तरदायींवर कठोर कारवाई केली पाहिजे !

हरिद्वार (उत्तराखंड) – उत्तराखंड सरकारच्या अन्न आणि सुरक्षा विभागाने मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्यात आलेल्या हरिद्वारमधील परिसरात मांसाहारी खाद्यपदार्थांचे वितरण केल्याच्या प्रकरणी ‘ऑनलाईन’ मागणी घेऊन अन्नपदार्थ वितरीत करणार्‍या ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ या आस्थापनांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. तसेच हरिद्वारच्या जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

१. हरिद्वार महापालिकेने शहराच्या हद्दीत मांसाहारी अन्नपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली असतांना ‘ऑनलाईन’ मागणी घेऊन खाद्यपदार्थांचे वितरण करणार्‍या आस्थापनांकडून शहराच्या अनेक भागांत मांसाहारी जेवण पाठवण्यात येत असल्याची माहिती समोर आली. यावरून वरील नोटीस पाठवण्यात आली आहे.

२. अन्न आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी आर्.एस्. पाल म्हणाले, ‘‘स्थानिकांच्या तक्रारींवरून अन्न आणि सुरक्षा विभागाकडून या प्रकरणी चौकशी चालू आहे.

‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ या आस्थापनांनी विभागाच्या पथकासमोर ‘एफ्एस्एस्एआय’चे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. उत्तर देण्यासाठी त्यांना ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ यांचे स्पष्टीकरण

‘झोमॅटो’ आस्थापनाने यावर म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही ‘एफ्एस्एस्एआय’ च्या मानांकानुसार काम करत आहोत. धार्मिक भावनांचा आदर करून आणि नियमांचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.’

‘स्विगी ने म्हटले आहे की, चुकीसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. नोटीस मिळाल्यानंतर आम्ही कार्यवाही केली आहे. १६ मार्चपासून आम्ही हरिद्वारमध्ये केवळ शाकाहारी जेवणाचे वितरण करत आहोत. आमच्याकडे ‘एफ्एस्एस्एआय’चा परवाना आहे.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now