व्यर्थ न हो सारे बलीदान !

‘पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी नुकतेच पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे भीषण आक्रमण केले. त्याविषयी मला ईश्‍वरी प्रेरणेने स्फुरलेले काव्य पुढे देत आहे.

श्री. द.र. पटवर्धन

एकाहत्तर वर्षे पूर्ण झाली ।
भारताच्या स्वराज्याला ॥

स्वराज्याचे सुराज्य करणे ।
साध्य न झाले कुणाला ॥ १ ॥

फाळणीची घोडचूक करून ।
मुसलमानांसाठी निर्मिला पाकिस्तान ॥

मग मुसलमानविरहित कां न निर्मिला ।
उर्वरित हिंदुस्थान ॥ २ ॥

निधर्मी राष्ट्रप्रणाली स्वीकारून ।
अधर्मी अल्पसंख्यांकांचे केले लाड ॥

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ।
हिंदूंचे जीवन केले उजाड ॥ ३ ॥

असूनी खास मालक घरचा ।
म्हणती चोर त्याला ॥

अशी हीन वागणूक आली ।
केवळ हिंदूंच्या वाट्याला ॥ ४ ॥

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ।
मरणोत्तरही न दिले भारतरत्न ॥

परंतु अशा काही जणांना दिले भारतरत्न ।
ज्याने त्या पुरस्काराचे झाले अवमूल्यन ॥ ५ ॥

कोणाला करावेसे वाटत नाही ।
धर्म-संस्कृती-राष्ट्र रक्षण ॥

ज्याला त्याला वाटते ।
केवळ आपणांस मिळावे आरक्षण ॥ ६ ॥

गेल्या एकाहत्तर वर्षांत ।
पाकिस्तानची झाली असंख्य आक्रमणे ॥

अगणित सैनिक हुतात्मा झाले ।
अन् अपरिमित हानी झाली भारताची । । ७ ॥

त्या-त्या वेळी अशाच प्रतिक्रिया ।
अन् मुळमुळीत औपचारिकता ॥

भ्याड हल्ले-करारा जबाब (टीप) ।
अन् विविध श्रद्धांजलीच्या कथा ॥ ८ ॥

तात्कालिक संताप-भावना निवळल्या ।
की परत येरे माझ्या मागल्या ॥

पापस्तानची नित्य निर्भीड आक्रमणे ।
आपण म्हणतो त्यास भ्याड वाकुल्या ॥ ९ ॥

भ्याड असोत वा धाडसी ।
आक्रमणे करती असंख्य वेळा ॥

ज्याने होते सर्वाधिक राष्ट्रहानी ।
त्यावर का फिरविती बोळा ॥ १० ॥

पुष्कळ झाले…आता असह्य झाले ।
आतातरी व्हा सतर्क अन् सावधान ॥

भूत-वर्तमानाचा पूर्ण घ्या बदला ।
व्यर्थ न हो सारे बलीदान ॥ ११ ॥’

टीप – भ्याड आक्रमणे करणार्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ.

– आपला सर्वांचा कृपाभिलाषी आणि नम्र,

श्री. द.र. पटवर्धन, माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग. (१७.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF