उष्णतेच्या विकारांवर घरगुती औषधे

वैद्य मेघराज पराडकर

१. उष्णतेच्या विकारांची काही लक्षणे

‘घशात, छातीत किंवा पोटात जळजळ होणे; लघवीला आग होणे; अंगावर पुळ्या येणे; डोळे, हात किंवा पाय गरम होणे; मासिक पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव होणे; शौचावाटे रक्त पडणे

२. घरगुती औषधे

अ. चहाचा १ चमचा सब्जाचे (किंवा तुळशीचे) बी पाव वाटी पाण्यात ८ घंटे भिजत ठेवावे. त्यानंतर ते कपभर दुधात (टीप १) घालून सायंकाळी प्यावे.

टीप १ – दूध पिण्यासंदर्भात सर्वसाधारण नियम : औषध घातले असलेले किंवा नसलेले दूध पिण्यापूर्वी ३ घंटे आणि दूध प्यायल्यावर न्यूनतम दीड घंटा काही खाऊ नये.

आ. पेठेत (बाजारात) साखरेच्या पाकात बनवलेले गुलाबाचे दाट सरबत (सिरप) मिळते. हे १ चमचा दाट सरबत कपभर दुधात घालून सायंकाळी प्यावे. यात वरीलप्रमाणे चमचाभर भिजवलेले सब्जाचे (किंवा तुळशीचे) बीही घालता येते.

इ. दिवसातून १ – २ वेळा आवश्यकतेनुसार गुलाबाचे सरबत प्यावे किंवा १ – १ चमचा गुलकंद खावा.’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०१८)

हृदय, तसेच सर्व शरीर यांच्या विकारांत आयुर्वेदीय औषध देण्याची वेळ

दुपारच्या जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड घंट्याने दिलेल्या औषधाचा परिणाम हृदयावर, तसेच सर्व शरीरभर होतो; कारण हा व्यान वायूचा काळ आहे. व्यान वायू हा हृदयाच्या आश्रयाने  राहून सर्व शरीरभर फिरणारा वायू आहे.

– वैद्य मेघराज पराडकर (१८.२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now