भावी भीषण आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी विविध उपाय सांगणारे ग्रंथ आधीच प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा थोडक्यात परिचय !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्यांची तीव्रता आणखी वाढेल. या आपत्तींमध्ये तिसर्‍या महायुद्धाचीही भर पडेल. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध करत असून आतापर्यंत या मालिकेतील २१ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. हे ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत. या सर्व ग्रंथांची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी प्रस्तुत सदरात ग्रंथांचे मनोगत प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत; कारण ते भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृतीही करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’

ग्रंथाचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सौ. अंजली यशवंत कणगलेकर

ग्रंथाचे मनोगत

सध्याच्या कलियुगातील रज-तमात्मक वातावरणात जन्मलेला प्रत्येक जीव काही ना काहीतरी विकार घेऊनच जन्माला आलेला असतो. ‘विकार दूर करण्याच्या ‘अ‍ॅलोपॅथी’, ‘होमिओपॅथी’ यांसारख्या आधुनिक आणि आयुर्वेद या उपायपद्धती प्रचलित असतांना ‘बिंदूदाबन’ या उपायपद्धतीची आवश्यकता काय’, असा प्रश्‍न कोणाला पडू शकतो. ‘जुने ते सोने’ या म्हणीनुसार प्रज्ञावंत ऋषीमुनींनी शोधलेली ‘बिंदूदाबन’ ही अतिप्राचीन उपायपद्धत महत्त्वाची आहे; कारण तिला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे. शरिरातील चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करणारे शरिरावरील विशिष्ट बिंदू दाबल्यामुळे चेतनाशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन विकारांवर मात करता येणे, हे ‘बिंदूदाबन’ उपायपद्धतीचे सूत्र आहे. या पद्धतीमुळे त्या त्या अवयवात चेतना निर्माण होऊन त्या त्या अवयवाचीच क्षमता वाढत असल्याने ही पद्धत अधिक मूलगामी आणि परिणामकारक ठरते. व्यय नसलेल्या (बिनखर्चिक) आणि स्वतःच स्वतःवर उपाय करता येणार्‍या बिंदूदाबन उपायपद्धतीचा अंगिकार करून दैनंदिन जीवनात तोंड द्याव्या लागणार्‍या अनेक रोगांपासून स्वतःला दूर ठेवणे सहज शक्य होते. तसेच जीवनात घडणार्‍या काही प्रसंगांत वैद्यकीय उपायांची तात्काळ निकड भासते किंवा काही प्रसंगांत डॉक्टर आणि औषधे दोन्ही उपलब्ध नसतात, अशा वेळी ही पद्धत लहान-मोठ्या सर्वांसाठीच संजीवनी ठरते.

बिंदूदाबन उपायपद्धतीवर उपलब्ध असलेल्या बहुतांश ग्रंथांत मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांचाच विचार केलेला आढळतो. सध्याच्या कलियुगात प्रत्येकाला अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास आहेच; किंबहुना बर्‍याचदा आध्यात्मिक कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास निर्माण झालेले असतात. सनातन-निर्मित बिंदूदाबनविषयाच्या ग्रंथांत शारीरिक आणि मानसिक त्रासांच्या जोडीलाच आध्यात्मिक त्रासांचा अन् त्यांच्या निवारणाचाही विचार केला आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी अनुक्रमे मध्यम दाब देऊन, हलकासा दाब देऊन आणि स्पर्श न करता प्रार्थना, नामजप, ध्यान आदी मार्गांनी आध्यात्मिक सामर्थ्यावर बिंदूदाबन उपाय कसे करावेत, याचे शास्त्रीय मार्गदर्शन, हे सनातन-निर्मित ग्रंथांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.

प्रस्तूत ग्रंथात बिंदूदाबन उपाय म्हणजे काय, उपायांचे महत्त्व, उपायांमुळे होणारे लाभ, शरिरावरील बिंदूंची ठिकाणे, बिंदूंवर दाब देण्याची योग्य पद्धत, उपाय केव्हा आणि किती वेळ करावेत, उपाय केव्हा करू नयेत, रेकीसारखे उपाय अन् बिंदूदाबन उपाय यांमधील भेद (फरक) इत्यादींविषयीचे विवेचन  केले आहे.

बिंदूदाबनामुळे सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे सर्वसामान्य व्यक्तीला कळू शकत नाही. हे कळण्याची क्षमता असलेले सनातनचे साधक, तसेच अन्य काही साधक यांनी केलेली ‘सूक्ष्म परीक्षणे’ आणि काढलेली ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीची चित्रे’, हे या ग्रंथाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. अनवाणी चालणे, कानात आणि नाकात अलंकार घालणे, गोंदणे यांसारख्या हिंदूंच्या जीवनपद्धतीचा एक भाग बनलेल्या आचारांमुळे आपोआप बिंदूदाबन कसे घडते, याची सूक्ष्म ज्ञानाविषयीची चित्रे पाहिल्यावर हिंदु धर्माची महानताही लक्षात येईल.

बिंदूदाबन उपायपद्धतीचा दैनंदिन जीवनात उपयोग करून स्वतःचे आणि इतरांचेही जीवन व्याधीमुक्त अन् आनंदी बनवण्याची प्रेरणा अधिकाधिक जणांना मिळो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना ! – संकलक

सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाइन’ खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !

विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !

स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७


Multi Language |Offline reading | PDF