नांदेड येथे हिंदुस्थान युनिलिव्हरच्या विरोधात प्रशासनास निवेदन सादर !

निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

नांदेड – हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या बहुतांश उत्पादनांची विज्ञापने हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारी असून अशा प्रक्षोभक विज्ञापनांचे प्रक्षेपण बंद करावे, तसेच संबंधितांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन नांदेडचे उपजिल्हाधिकारी श्री. संतोष वेणीकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी श्री. बिरबल यादव, श्री. गौतम जैन, श्री. गणेश कोकुलवार,

श्री. गणेश फुलारी, श्री. गजानन गादेवार, श्री. संजय बोतकुलवार, श्री. संतोष पाम्पट्वार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय बडगुजर आणि श्री. मनोहर देशपांडे, सौ. रघोजीवार हे उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF