हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या विरोधात अकोला येथे शासकीय अधिकार्‍यांना निवेदन

प्रशासनाला निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

अकोला, १५ मार्च (वार्ता.) – हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या विरोधात येथे १२ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. कार्यालय अधीक्षक सौ. लता कानदे यांनी ते स्वीकारले.

हिंदुस्थान युनिलिव्हर या आस्थापनाकडून श्री गणेश जयंती, नवरात्र, कुंभमेळा आणि होळी यांचे औचित्य साधून हिंदुविरोधी विज्ञापने प्रसारित केली जात असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत यांनी या वेळी स्पष्ट केले. निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते श्री. संतोष धोत्रे, श्री. राहुल चुटके उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF