हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार आणि लेखक

लेखक प्रा. पराग वैद्य यांच्या ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम

डावीकडून चित्पावन ब्राह्मण संघाचे श्री. माधवराव घुले, लेखक प्रा. पराग वैद्य, प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर, पै फ्रेंड्स लायब्ररीचे श्री. पुंडलिक पै

डोंबिवली, १५ मार्च (वार्ता.) – आज लोकांना जे खरे आहे, ते द्यायला हवे. श्रीराम समजून घ्यायचा असेल, तर रावण हवाच. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर औरंगजेब हवा आणि हिटलर समजून घ्यायचा असेल, तर स्टॅलिन हवा. जगात सर्वांत जास्त हिंसा घडवणारे डावे विचारवंत आणि मुसलमान आहेत. जे सांगू जे लिहू त्याप्रमाणे वागणे, याला विचारवंत म्हणतात. हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत, असे प्रतिपादन प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

९ मार्च या दिवशी डोंबिवली (पूर्व) येथील शास्त्री सभागृहात ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर हे प्रमुख पाहुणे, तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यासह चित्पावन ब्राह्मण संघाचे श्री. माधवराव घुले आणि ‘पै फ्रेंड्स’ वाचनालयाचे श्री. पुंडलिक पै यांचीही उपस्थिती होती.

डॉ. शेवडे पुढे म्हणाले की, भारतातील उजवे हे हिंदुत्वनिष्ठ आहेत. ते मुळातच सहिष्णू असल्यामुळे त्यांच्यामध्ये हिंसक विचार येतच नाहीत. याउलट जगात ख्रिस्ती आणि मुसलमान हे मूलतः दोन पंथ आहेत. त्यांच्या मते एकच ईश्‍वर आहे आणि त्याला तुम्ही मान्य करा अन्यथा मरा. हा मूलतत्त्ववाद आहे. हिंदुत्ववाद सत्य आणि अहिंसा या गुणांवर आधारित आहे. हा आमचा मूलतत्त्ववाद आहे. आमच्यात नास्तिक (आस्तिक) हिंदूच आहेत आणि नास्तिकही हिंदूच आहेत; पण मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या पंथात तसे नाही आहे.

प्रसारमाध्यमांना चालू असलेला आतंकवाद कधीच दिसला नाही; पण नसलेला आतंकवाद मात्र ते नेहमी दाखवतात ! –  प्रा. पराग वैद्य, लेखक

काही विशिष्ट देशांत प्रसारमाध्यमांनी नागरिकांची विभागणी दोन गटांत केलेली दिसून येते. बहुतांश वेळा ती धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर केलेली असते. यापैकी एक गट निष्पाप (मासूम) लोकांचा असतो, तर दुसरा गट दंगेखोर लोकांचा असतो. प्रत्यक्षात मात्र हे निष्पाप (मासूम) लोकच नेहमी दंगली घडवत असतांना दिसतात. प्रसारमाध्यमे मात्र त्यांच्या हिंसक कृतीला ‘संतप्त जमावाचे आक्रमण’, असे सांगतात. प्रसारमाध्यमांना या लोकांचा रंग दिसत नाही. ज्या गटाला प्रसारमाध्यमे दंगेखोर म्हणतात, ते मात्र निष्पापांच्या (मासूमांच्या) दहशतीला कसेतरी उत्तर देऊन आत्मरक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. या कृतीलाचा प्रसारमाध्यमे ‘दंगा’ असे संबोधतात. प्रसारमाध्यमांना चालू असलेला आतंकवाद कधीच दिसला नाही; पण नसलेला आतंकवाद मात्र ते नेहमीच दाखवत रहातात. अशा देशात निष्पाप (मासूम) म्हणवले जाणारे हिंसक नेहमी अल्प असतात, तर आतंकवादी म्हटले जाणारे बहुसंख्य प्रत्यक्षात शांत असतात. हे सामाईक सूत्र आहे, असे प्रतिपादन लेखक प्रा. पराग वैद्य यांनी केले.

जे आपल्या समोर आले, त्यावर डोळेझाकपणे विश्‍वास ठेवू नका ! – भाऊ तोरसेकर

प्रवाहाविरुद्ध विचार मांडणे, ही छोटी गोष्ट नाही. सगळीकडून विरोध सहन करावा लागतो. ते काम पराग वैद्य यांनी केले आहे. आजची पत्रकारिता म्हणजे नाटक झाले आहे. ज्यांना खोटे मांडायचे आहे, ते चित्र तयार करून ठेवतात आणि त्याप्रमाणे मांडतात. त्यामुळे आपल्यासमोर जे येते, त्यावर डोळेझाकपणे विश्‍वास ठेवू नका. ते तपासून घ्या आणि प्रश्‍न विचारायला शिका. जे घडले आहे, त्यासंबंधी उलट पडताळायला शिका. एवढे केले तरी त्यादृष्टीने देशहितासाठीही चांगले होईल.


Multi Language |Offline reading | PDF